Share

मिलिंद नार्वेकरांच्या ‘त्या’ ट्विटचे देवेंद्र फडणवीसांकडून समर्थन

Published On: 

मुंबई : शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी अयोध्येत राममंदिर उभारण्यासाठी 6 डिसेंबर 1992 रोजी झालेल्या बाबरी विध्वंसाची आठवण करून दिली आहे. आजच्याच दिवशी बाबरी मशीद पाडली होती. याबाबतचे ट्विट मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांनी केले आहे.

‘अयोध्येत राममंदिर निर्माणासाठी बलिदान केलेल्या शिवसैनिकांना कोटी कोटी नमन असं ट्वीट नार्वेकर यांनी केले आहे. त्यांच्या या ट्विटवरुन राजकारणात वाद उभा सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मिलिंद नार्वेकर म्हणजे नवे शिवसेना प्रमुख का? असा सवाल केला. मात्र, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मिलिंद नार्वेकरांनी केलेल्या ट्विटचे समर्थन केले आहे.

मिलिंद नार्वेकरांनी केलेल्या ट्विटबाबत देवेंद्र फडणवीसांना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिले आहे. नार्वेकरांनी केलेल्या ट्विट हे बरोबरच आहे. त्यात चूक काय आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

दरम्यान,सध्या राम मंदिर निर्माण सुरु आहे, अशातच ही श्रेयवादाची लढाई म्हणावी लागेल. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अयोद्धा दौरा केला होता. तर दुसरीकडे भाजपकडून मंदिराच्या निर्माणाची सुरुवात करण्यात आली आहे. अशातच या प्रकरणातील शिवसेनेचे योगदान विसरुन चालणार नाही, असे मिलिंद नार्वेकर म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!