Share

“नाना पटोले आप आगे बढो, चमचे आपके साथ है”, पटोलेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर भातखळकरांची टीका

Published On: 

मुंबई : काल (२९ मार्च) काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांनी सन २०२४ साली नरेंद्र मोदी यांच्या पराभवानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी (rahul gandhi) यांच्या नेतृत्वात काँग्रेस सरकार सत्तेवर येईल, असा दावा केला. या मुद्द्यावरून राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचे वारे वाहू लागले आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी पटोलेंवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.

यासंदर्भात अतुल भातखळकर यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘आगामी लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारचा पराभव होईल आणि राहुल गांधींच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेसचं सरकार स्थापन होईल’, असे नाना पटोले म्हणाले. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या निर्विवाद यशामुळे नानांचा आत्मविश्वास दुणावलेला असावा. ‘ तसेच नाना पटोले आप आगे बढो चमचे आपके साथ है, असे भातखळकर म्हणाले आहेत.

https://twitter.com/BhatkhalkarA/status/1508655063505727495?s=20&t=hUtHIsq4MI_lLq_lJUutHA

दरम्यान, नाना पटोले यांनी इंधन दरवाढीवरूनही केंद्रावर निशाणा साधला असून आज पुन्हा पेट्रोल ३० पैसे, तर डिझेल ३५ पैशांनी वाढले. गेल्या ७ दिवसात इंधनाचे दर ४ रूपयांनी वाढले. निवडणूक असती तर मोदी सरकारने अशी दरवाढ होऊ दिली नसती. भाजपला केवळ सत्ता हवी आहे. जनतेशी देणेघेणे नाही, असे पटोले यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!