मुंबई : घरगुती गॅस सिलेंडर महागला असून सर्वसामान्यांना महागाईचा चांगलाच फटका बसला आहे. फक्त इतकेच नाही तर पेट्रोल आणि डिझेलमध्येही ८० पैशांची वाढ करण्यात आली आहे. या मुद्द्यावरून आता राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचे वारे वाहू लागले आहे. याच पार्श्वभूमीवर बोलत असतांना राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी मोदी सरकारवर टीका केली होती. दरम्यान, राऊतांच्या टीकेला आता भाजप नेते अतुल भातखळकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
यासंदर्भात अतुल भातखळकर यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘९५० वजा ४१०, याचे उत्तर ६४० कसं येतं डॉक्टर नितीन राऊत साहेब?विजेची बिलं अशाच मनमानी बेरजा वजाबाक्या करून भरमसाठ पाठवायची सवय लागली आहे तुम्हाला. आधुनिक भास्कराचार्य नितीन राऊत’, असे भातखळकर म्हणाले आहेत.
दरम्यान, ‘२०१४- ४१० रु तसेच २०२२- ९५० रु, ७ वर्षात एलपीजी सिलेंडरची किंमत ६४० रुपयांनी वाढली. त्याचे श्रेय घेण्यासाठी ते कधीच पुढे येणार नाही’, असे नितीन राऊत आपल्या ट्विटमध्ये म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या
- “…पण रोज आदळणाऱ्या महागाईच्या लाटांचे काय?”, संजय राऊतांचा केंद्र सरकारला सवाल
- “पेट्रोल-डिझेलची दरवाढ जशी केंद्र सरकारने रोखून धरली होती, तशी औषध…”, राऊतांचे टीकास्त्र
- IPL 2022: सनरायझर्स हैदराबाद भिडणार राजस्थान रॉयल्सशी; जाणून घ्या कशी आहे खेळपट्टी
- “वारे रे पाकिटमार मोदी सरकार”, महागाईवरून नाना पटोलेंचा हल्लाबोल
- LSG vs GT: लखनौच्या ‘या’ खेळाडूची दमदार खेळी बघून कर्णधार राहुल म्हणाला, हा तर ‘बेबी एबी’!

