नवी दिल्ली: IPL 2022 मध्ये नव्याने सामील झालेले लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) या दोन्ही संघांत काल (२८ मार्च) पहिला सामना झाला. मोहम्मद शमीची खतरनाक गोलंदाजी आणि राहुल तेवतियाच्या स्फोटक खेळीच्या जोरावर गुजरात टायटन्सने लखनऊ सुपर जायंट्सचा ५ विकेट्सने पराभव केला. लखनौने प्रथम फलंदाजी करताना 5 गड्यांच्या मोबदल्यात 158 धावा केल्या पण गुजरात संघाने दोन चेंडू बाकी असताना 5 बाद 161 धावा करून सामना जिंकला.
राहुल तेवतियाने आपल्या खेळीत पाच चौकार आणि दोन षटकार ठोकले तर मिलरने 21 चेंडूत दोन षटकार आणि एक चौकार लगावला. या दोघांनी 60 धावांची भागीदारी करत सामना गुजरातकडे वळवला. मनोहरने सात चेंडूंच्या नाबाद खेळीत तीन शानदार चौकार मारले. आयुष बडोनी (54) आणि दीपक हुडा (55) यांची अर्धशतके आणि दोघांमध्ये पाचव्या विकेटसाठी केलेल्या शानदार 87 धावांच्या भागीदारीच्या जोरावर लखनऊने आव्हानात्मक धावसंख्या उभारली.
दरम्यान लखनऊचा कर्णधार केएल राहुल (Captain Rahul)आयुष बडोनीच्या (Ayush Badoni) खेळीमुळे खूश होत म्हणाला की, “आयुष बडोनी आमच्यासाठी बेबी एबी (डिव्हिलियर्स) आहे. पहिल्या दिवसापासून तो हुशार होता. नवीन खेळाडूसाठी हे सोपे नव्हते. तो चौफेर शॉट्स खेळतो. मी त्याच्यासाठी खूप आनंदी आहे कारण त्याने संधी साधली. चार विकेट्सनंतर अशी इनिंग खेळणे सोपे नव्हते, पण दबावाखाली त्याने चांगली कामगिरी केली आहे.” आयपीएल सामन्यात शानदार अर्धशतक झळकावणारा आयुष बडोनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये दिल्लीकडून खेळतो. श्रीलंकेविरुद्धच्या अंडर-19 सामन्यातही त्याने 185 धावांची इनिंग खेळली आहे. तर आयुष हा आयपीएल पदार्पणात अर्धशतक करणारा श्रीवत्स गोस्वामी आणि देवदत्त पडिक्कल यांच्यानंतरचा तिसरा सर्वात तरुण फलंदाज ठरला आहे.
महत्वाच्या बातम्या:
IPL 2022: सनरायझर्स हैदराबाद भिडणार राजस्थान रॉयल्सशी; जाणून घ्या कशी आहे खेळपट्टी
“पेट्रोल-डिझेलची दरवाढ जशी केंद्र सरकारने रोखून धरली होती, तशी औषध…”, राऊतांचे टीकास्त्र
“…पण रोज आदळणाऱ्या महागाईच्या लाटांचे काय?”, संजय राऊतांचा केंद्र सरकारला सवाल
IPL 2022 GT vs LSG : हार्दिकसेनेचा विजयारंभ..! रोमहर्षक सामन्यात गुजरातची लखनऊवर ५ गड्यांनी मात!
IPL 2022 GT vs LSG : लखनऊचा मेंटॉर गौतम गंभीरचं सोशल मीडियावर का होतंय कौतुक? वाचा कारण!

