Share

“मी चुकलो..” क्रिस रॉकच्या कानशिलात लगावल्यानंतर विल स्मिथची पोस्ट चर्चेत

Published On: 

मुंबई : यावर्षीचा ऑस्कर पुरस्कार सोहळा दणक्यात पार पडला. परंतु या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यादरम्यान एक धक्कादायक घटनाही पाहायला मिळाली. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार पटकावणाऱ्या अभिनेता विल स्मिथ याने सूत्रसंचालक क्रिस रॉकवर भर कार्यक्रमात कानाखाली मारली. या घटनेनंतर याचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. आता या संपूर्ण प्रकरणानंतर विल स्मिथने एक पोस्ट शेअर करत जाहीर माफी मागितली आहे. त्यात त्याने मी त्यावेळी चुकीचा वागलो, असेही म्हटले आहे.

विल स्मिथने अवघ्या काही तासांपूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. विल स्मिथ म्हणाला, “कोणत्याही स्वरूपात होणारी हिंसा ही विषारी आणि विनाशकारी असते. काल रात्रीच्या अकादमी पुरस्कार सोहळ्यातील माझे वर्तन अस्वीकार्य आणि अक्षम्य होते. माझ्या खर्चाची खिल्ली उडवणे हा माझ्या कामाचा भाग आहे. परंतु पत्नीच्या वैद्यकीय स्थितीची खिल्ली उडवण्यात आल्यानंतर माझ्या सहनशक्तीचा अंत झाला आणि मी भावनेच्या भरात ते पाऊल उचलले.”

https://www.instagram.com/p/CbqmaY1p7Pz/?utm_source=ig_web_copy_link

“क्रिस, या प्रकरणानंतर मला तुझी जाहीरपणे माफी मागायची आहे. मी माझी हद्द ओलांडली. मी चुकीचा होतो. मला याची लाज वाटत आहे. मी काल केलेली ही कृती मला जो माणूस व्हायचे आहे, त्यासाठी योग्य नाही. प्रेम आणि दयाळूपणाच्या जगात हिंसेला स्थान नाही. मी अकादमीची, शोचे निर्माते, सर्व उपस्थित आणि जगभरात हा कार्यक्रम पाहणाऱ्या प्रत्येकाचीही जाहीर माफी मागू इच्छितो. मला विल्यम्स कुटुंबाची आणि माझ्या राजा रिचर्ड कुटुंबाचीही माफी मागायची आहे. माझ्या वागण्याने या सुंदर प्रवासावर एक डाग पडला आहे, याचे मला मनापासून खेद वाटतो. मी त्यावर काम करत आहे आणि करेन”, असे विल स्मिथ म्हणाला.

विल स्मिथने शेअर केलेली ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. त्याची ही पोस्ट व्हायरल होतानाही दिसत आहे. त्याच्या या पोस्टवर क्रिसने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र त्याची ही पोस्ट अनेक सेलिब्रिटींना लाईक केल्याचे पाहायला मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या

LSG vs GT: लखनौच्या ‘या’ खेळाडूची दमदार खेळी बघून कर्णधार राहुल म्हणाला, हा तर ‘बेबी एबी’!

“वारे रे पाकिटमार मोदी सरकार”, महागाईवरून नाना पटोलेंचा हल्लाबोल

IPL 2022: सनरायझर्स हैदराबाद भिडणार राजस्थान रॉयल्सशी; जाणून घ्या कशी आहे खेळपट्टी

“पेट्रोल-डिझेलची दरवाढ जशी केंद्र सरकारने रोखून धरली होती, तशी औषध…”, राऊतांचे टीकास्त्र

“…पण रोज आदळणाऱ्या महागाईच्या लाटांचे काय?”, संजय राऊतांचा केंद्र सरकारला सवाल

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!