Share

IPL 2022 : कर्णधार हार्दिक पंड्याच्या ‘त्या’ प्रश्नावर मोहम्मद शमी म्हणाला ‘नाही’; वाचा काय होता तो प्रश्न!

Published On: 

नवी दिल्ली: IPL 2022 मध्ये नव्याने सामील झालेले लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) या दोन्ही संघांत काल (२८ मार्च) पहिला सामना झाला. मोहम्मद शमीची खतरनाक गोलंदाजी आणि राहुल तेवतियाच्या स्फोटक खेळीच्या जोरावर गुजरात टायटन्सने लखनौ सुपर जायंट्सचा ५ विकेट्सने पराभव केला. लखनौने प्रथम फलंदाजी करताना 5 गड्यांच्या मोबदल्यात 158 धावा केल्या पण गुजरात संघाने दोन चेंडू बाकी असताना 5 बाद 161 धावा करून सामना जिंकला.

मोहम्मद शमीला त्याच्या शानदार गोलंदाजीसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. विजयानंतर शमीने (Mohammed Shami) खुलासा केला की, कर्णधार हार्दिक पंड्याने (Captain Hardik Pandya) त्याला सलग चौथे षटक टाकण्यास सांगितले, परंतु त्याने नकार दिला. तो म्हणाला की, “पहिल्याच चेंडूपासून मला फक्त चांगली लाईन आणि लेन्थने गोलंदाजी करायची होती. जेव्हा चेंडू तुमच्या हातात चांगला येतो तेव्हा लोक म्हणतात की ते नैसर्गिक आहे, परंतु तसे नाही. मी माझ्या सीम पोझिशनवर खूप मेहनत घेतली आहे. हार्दिकने मला विचारले की मला माझे सलग चौथे षटक टाकायचे आहे का, मी म्हटले नाही, माझे एक षटक नंतरसाठी ठेव.”

शमीने लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलला सामन्याच्या पहिल्याच षटकाच्या पहिल्याच चेंडूवर झेलबाद करून गुजरातला चांगली सुरुवात करून दिली. राहुलला खातेही उघडता आले नाही. आपल्या दुसऱ्याच षटकात शमीने क्विंटन डी कॉकला बोल्ड करून सुपर जायंट्सला दुहेरी धक्का दिला. डी कॉक 9 चेंडूत 7 धावा करू शकला. यानंतर शमीने तिसर्‍या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर मनीष पांडेला बाद करून लखनौला मोठा धक्का दिला. मनीषला 5 चेंडूत केवळ 6 धावा करता आल्या. शमीच्या या खेळीला त्याचा सामनावीर म्हणून गौरव करण्यात आला.

महत्वाच्या बातम्या:

“विजेची बिलं अशाच मनमानी…”, भातखळकरांचा नितीन राऊतांना जोरदार टोला

LSG vs GT: लखनौच्या ‘या’ खेळाडूची दमदार खेळी बघून कर्णधार राहुल म्हणाला, हा तर ‘बेबी एबी’!

“वारे रे पाकिटमार मोदी सरकार”, महागाईवरून नाना पटोलेंचा हल्लाबोल

IPL 2022: सनरायझर्स हैदराबाद भिडणार राजस्थान रॉयल्सशी; जाणून घ्या कशी आहे खेळपट्टी

“पेट्रोल-डिझेलची दरवाढ जशी केंद्र सरकारने रोखून धरली होती, तशी औषध…”, राऊतांचे टीकास्त्र

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!