भंडारा: जे सत्तेचे पिपासू आहेत. त्यांची सकाळची सत्ता गेल्यानंतर त्यांची जी तडफड सुरू आहे. त्या तडफेचा हा आवाज आहे. या सरकारमध्ये तिन्ही पक्षांची बरोबरीची भागिदारी आहे. असे मीडियाशी संवाद साधताना नाना पटोले म्हणाले.
तसेच पुढे म्हणाले, “किमान समान कार्यक्रमावर हे सरकार सुरू आहे. कोरोनामुळे हा अजेंडा राबवता आला नाही. आता अजेंडा राबवणं सुरू झालं आहे. विरोधकांना त्याचा त्रास होत आहे. त्यामुळे अफवा उडवून सरकारमध्ये मतभेद निर्माण केला जात आहे. पण यांच्या काळ्या जादूचा फरक पडणार नाही. त्यांची सत्तेवर काळी नजर आहे. पण या काळ्या जादूचा प्रभाव पडणार नाही. हे सरकार पाच वर्ष चालेल”, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.
कालही ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून नाना पटोले यांनी भाजपला धारेवर धरले होते. ओबीसींचे हक्क त्यांना मिळाले पाहिजेत आणि ते न्याय हक्क मिळवून देण्यासाठी काम करु. ओबीसी आरक्षणासाठी आवश्यक असलेला केंद्र सरकारकडील डाटा 98 टक्के अचूक आहे पण ते देत नाहीत. जाणीवपूर्वक अडवणूक केली जात आहे. महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे, महात्मा फुले व सावित्रिबाई यांनी देशाला दिशा देण्याचे काम केले पण त्यांचा अपमान करण्याचे धाडस राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले, महाराष्ट्र हा अपमान सहन करणार नाही. ओबीसी समाजासाठी मी सदैव संघर्ष करत आलो आहे आणि आपले हक्क मिळवण्यासाठी यापुढेही संघर्ष करत राहू, असं पटोले मीडियाशी संवाद साधताना म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या –
“…पण रोज आदळणाऱ्या महागाईच्या लाटांचे काय?”, संजय राऊतांचा केंद्र सरकारला सवाल
IPL 2022 GT vs LSG : हार्दिकसेनेचा विजयारंभ..! रोमहर्षक सामन्यात गुजरातची लखनऊवर ५ गड्यांनी मात!
IPL 2022 GT vs LSG : लखनऊचा मेंटॉर गौतम गंभीरचं सोशल मीडियावर का होतंय कौतुक? वाचा कारण!
IPL 2022 GT vs LSG : हुडा, बदोनीमुळं लखनऊ सावरलं; गुजरातला मिळालं १५९ धावांचं आव्हान!
IPL 2022 : …अन् दीपक हुड्डाची धमाकेदार खेळी बघून कृणाल पंड्याही झाला खूश; वाजवल्या टाळ्या!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

