मुंबई: सध्याच्या अधिवेशनात विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना विविध मुद्दे उपस्थित करून सत्ताधाऱ्यांची कोंडी केली केली आहे. या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित होत आहे तो म्हणजे विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यापासून हे पद रिक्तच आहे. या निवडणुकीवरून सत्ताधाऱ्यांकडून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लक्ष्य करण्यात येत आहे. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याची परवानगी राज्यपालांकडून मिळाली नसल्याचे सरकारकडून सांगण्यात येत आहे.
विधानसभेचे माजी अध्यक्ष नाना पटोले यांनी या मुद्द्यावरून राज्यपालांवर निशाणा साधला आहे. “विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक याच अधिवेशनात पार पडावी यासाठी महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांची चर्चा झाली आहे. सरकारच्या वतीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना तसे पुन्हा कळवण्यात येईल. परंतु राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे राज्यपाल राहिले नसून ते ‘भाजप’पाल झाले आहेत. त्यांच्याकडून काय अपेक्षा करायच्या?” अशी संतप्त प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे.
विधिमंडळ आवारात प्रसारमाध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, “विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनातच व्हावी यासाठी महाविकास आघाडी सरकारचा प्रयत्न आहे. परंतु अद्याप राजभवनवरून अध्यक्षपदाच्या निवडणूक कार्यक्रमासंदर्भात प्रतिसाद आलेला नाही. सर्व कायदेशीर बाबींचा अभ्यास करून राज्यपाल महोदयांना पुन्हा याबाबत संदेश दिला जाईल”.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

