Share

“सरकार झुकती है, बस…” चंद्रकांत पाटलांचे फिल्मी स्टाईल ट्विट

Published On: 

मुंबई: शेतकऱ्यांच्या वीज तोडणीवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज विधानसभेत आक्रमक झाल्याचे दिसून आले. शिवाय, या कारवाईमुळे राज्यातील शेतकऱ्यांमधूनही संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. त्यामुळे अखेर महाविकास आघाडी सरकारने आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांच्या वीज तोडणीसंदर्भात मोठा निर्णय जाहीर केला. शेतकऱ्यांच्या वीज तोडणीला तूर्तास स्थगिती देण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याची घोषणा उर्जामंत्री नितीन राऊत यांनी केली आहे. या निर्णयाचे विरोधकांनी स्वागत केले. तर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करत या निर्णयावरून महाविकास आघाडी सरकारला टोला लगावला आहे.

“महाविकासआघाडी सरकार झुकती है, बस झुकानेवाला चाहिए! अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून भाजपाने लावून धरलेल्या शेतकऱ्यांच्या वीजतोडणी संदर्भात अखेर मविआ सरकारला नमावेच लागले. वीजतोडणी तत्काळ थांबवण्याचे ऊर्जामंत्र्यांचे आदेश. गोरगरीब शेतकऱ्यांसोबत भाजपा सदैव खंभीरपणे उभी आहे.” असे पाटील यांनी या ट्विटमध्ये म्हणाले आहेत.

नितीन राऊतांची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा!

नितीन राऊत यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले की,‘शेतकऱ्यांची उभी पिकं शेतात असेपर्यंत थकबाकीपोटी वीज पुरवठा खंडित केला जाणार नाही अशी घोषणा आज विधानसभेत या विषयावरील चर्चेत उत्तर देताना मी केली. शेतकऱ्यांनी वीज बिल भरून सहकार्य करावे असे आवाहन यावेळी मी केले’, असे नितीन राऊत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!