Share

“संपादक जेलमध्ये जाणार म्हणून…”, संजय राऊतांच्या ‘त्या’ ट्वीटला ‘मनसे’चे प्रत्युत्तर

Published On: 

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काल (१२ एप्रिल) उत्तर सभा घेतली. यावेळी त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांच्यावर निशाणा साधत जोरदार टीका केली. संजय राऊत यांच्या शिवराळ भाषेवरून राज ठाकरेंनी त्यांना चांगलेच सुनावले. यावर संजय राऊत यांनी “दिवा विझताना मोठा होतो हे आज पुन्हा दिसले! जय महाराष्ट्र!”, असे ट्वीट करत प्रत्युत्तर दिले होते. यावरच आता मनसे नेते संदीप देशपांडे (sandeep Deshpande) यांनीही ट्वीट करत उत्तर दिले आहे.

राज ठाकरे नेमके काय म्हणाले होते?

सर्व जण गुढी पाडव्याच्या सभेनंतर एकदम चरफडले. नुसत्या मालमत्ता जप्त केल्या तर पत्रकार परिषदेत शिव्या द्यायला लागले. काय तरी पत्रकार परिषदेतली भाषा. वर्तमानपत्राचा संपादक पत्रकार परिषदेत येऊन भ**, चु** शब्द वापरतो. अंगाशी आलं म्हणून हे होतंय. यांच्यासाठी आमच्या आजोबांनी शब्द काढला होता. हे सगळे ‘लवंडे’ म्हणजे काय? पूर्वी जेवायला पत्रावळ्या असायच्या. त्यातला द्रोण वरण-आमटी पडली की लवंडायचं. तसे हे लवंडे, शिवसेनेकडून पडलं की तिकडे लवंडायचं, राष्ट्रवादीकडून पडलं की तिकडे लवंडायचं. त्यामुळे संजय राऊत हे नेमके कुठले हेच कळत नाही. शिवसेना की राष्ट्रवादी? असा खोचक सवाल करत राज ठाकरे यांनी संजय राऊतांवर टीका केली.

मनसेचे प्रत्युत्तर-

दरम्यान संजय राऊत यांनी “दिवा विझताना मोठा होतो हे आज पुन्हा दिसले! जय महाराष्ट्र!”, असे ट्वीट करत प्रत्युत्तर दिले होते. यालाच संदीप देशपांडे यांनी “संपादक जेल मध्ये जाणार म्हणून भर पत्रकार परिषदेत शिव्या घालतो. ही नवी म्हण आहे. जय महाराष्ट्र!”, असे ट्वीट करत प्रत्युत्तर दिले आहे.

महत्वाच्या बातम्या:

“जितनी चाबी भरी ‘भाजपा’ ने उतना…”, राष्ट्र्वादीचा राज ठाकरेंना टोला

मोठी बातमी! धनंजय मुंडेंना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल

“अशा लोकांना आमचे आजोबा लवंडे म्हणायचे”; राज ठाकरेंचा संजय राऊतांवर घणाघात

IPL 2022 CSK vs RCB : चौकार-षटकारांच्या पावसात चेन्नई एक्सप्रेसचा विजयारंभ; रंगतदार मॅचमध्ये बंगळुरूवर सरशी!

IPL 2022 : माइंडबॉब्लिंग..! RCBविरुद्धच्या मॅचमध्ये उडत्या रायुडूनं टिपला ‘अविश्वसनीय’ झेल; VIDEO पाहून हैराण व्हाल!

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!