Share

“त्यांना फार महत्व देऊ नका, योग्य वेळी मी…”, राज ठाकरेंच्या टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काल (१२ एप्रिल) उत्तर सभा घेतली. यावेळी त्यांनी अजित पवार, सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधत जोरदार टीका केली. यावर राजकीय क्षेत्रातून अनेक प्रतिक्रिया उमटत असताना उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र एका शब्दात प्रतिक्रिया देत विषय संपवला.

“त्यांना फार महत्व देऊ नका, योग्य वेळी मी योग्य उत्तर देईल. माझ्याकडे सर्व प्रश्नांची उत्तर आहेत.”, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. ते आज सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी ब्रीच कँडी रूग्णालयात गेले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. दरम्यान राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याची माहिती मिळत आहे. त्यांना मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या धनंजय मुंडे यांची प्रकृती स्थिर असून अचानक त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांच्या आवश्यक त्या तपासण्या करून त्यांच्यावर उपचार सुरू केले आहेत.

काय म्हणाले होते राज ठाकरे?

शरद पवारच मोदींना भेटून रेड टाकायला सांगत असतील. मला सांगा अजित पवारांच्या घरी छापा पडतो. मात्र सुप्रिया सुळेंच्या नाही पडत. शरद पवारांना कधीही चिडलेलं पाहिलं नाही. अजित पवारांच्या घरी रेड पडली, नवाब मलिकांना अटक झाली तरीही शरद पवार आणि मोदींचे संबंध मधुर कसे? सुप्रिया सुळे यांनी काही बोलू नये सुप्रिया सुळेंचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे सुळे वेगळे. असा टोला राज ठाकरे यांनी लगावला.

महत्वाच्या बातम्या:

“संपादक जेलमध्ये जाणार म्हणून…”, संजय राऊतांच्या ‘त्या’ ट्वीटला ‘मनसे’चे प्रत्युत्तर

“जितनी चाबी भरी ‘भाजपा’ ने उतना…”, राष्ट्र्वादीचा राज ठाकरेंना टोला

मोठी बातमी! धनंजय मुंडेंना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल

“अशा लोकांना आमचे आजोबा लवंडे म्हणायचे”; राज ठाकरेंचा संजय राऊतांवर घणाघात

IPL 2022 CSK vs RCB : चौकार-षटकारांच्या पावसात चेन्नई एक्सप्रेसचा विजयारंभ; रंगतदार मॅचमध्ये बंगळुरूवर सरशी!

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!