Share

“जितनी चाबी भरी ‘भाजपा’ ने उतना…”, राष्ट्र्वादीचा राज ठाकरेंना टोला

Published On: 

मुंबई: पाडवा मेळाव्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची काल (१२ एप्रिल) उत्तर सभा झाली. या सभेत त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना नेते संजय राऊत तसेच मशिदीवरील भोंगे याबाबत भाष्य केले. शरद पवार नास्तिक असून ते मुस्लीम मत जातील यामुळे कधीही छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेत नाहीत. असा आरोप राज ठाकरे यांनी केला. आता राष्ट्रवादीचे नेते क्लाईड क्रास्टो यांनी ट्वीट करत राज ठाकरेंना टोला लगावला आहे.

“कालची मनसेची उत्तर सभा ऐकल्यानंतर ‘अंधा कानून’ चित्रपटाचे गाणं आठवलं, फरक फक्त एका शब्दाचा होता, ‘जितनी चाबी भरी ‘भाजपा’ ने, उतना चले खिलौना”, अशी टीका क्लाईड क्रास्टो यांनी केली आहे. मविआ नेत्यांनी मनसेला भाजपची C टीम असल्याचा आरोप करत टीका केली आहे.

राज ठाकरे काय म्हणाले?

राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधत म्हटले की, “महाराष्ट्रात जातीचं राजकारण पवारांनी सुरु केलं. ते फक्त शाहू फुले आंबेडकर याचं नाव घेतात पण, शिवाजी महराजांचं नाव घेत नाहीत. कारण शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यावर मुसलमान मते मिळणार कशी? शरद पवार हे नास्तिक असून त्यांना देवधर्माशी काही देणं घेणं.”

महत्वाच्या बातम्या:

मोठी बातमी! धनंजय मुंडेंना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल

“अशा लोकांना आमचे आजोबा लवंडे म्हणायचे”; राज ठाकरेंचा संजय राऊतांवर घणाघात

IPL 2022 CSK vs RCB : चौकार-षटकारांच्या पावसात चेन्नई एक्सप्रेसचा विजयारंभ; रंगतदार मॅचमध्ये बंगळुरूवर सरशी!

IPL 2022 : माइंडबॉब्लिंग..! RCBविरुद्धच्या मॅचमध्ये उडत्या रायुडूनं टिपला ‘अविश्वसनीय’ झेल; VIDEO पाहून हैराण व्हाल!

शरद पवार छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेत नाहीत – राज ठाकरे

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!