Share

कबूल है, कबूल है, कबूल है.. यह क्या किया तुने समीर दाउद वानखेडे?

Published On: 

मुंबई: एनसीबी अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) आणि राष्ट्रवादी पक्षाचे नेते तथा अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यातील वाद दिवसेंदिवस चिघळत चालल्याचे चित्र बघायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आता मलिक यांनी समीर वानखेडे यांचा निकाहनामावर स्वाक्षरी करतानाचा फोटो ट्विट करत नवाब मलिक यांनी खळबळ उडवून दिली आहे.

नवाब मलिक यांनी समीर वानखेडे निकाहनाम्यावर स्वाक्षरी करतानाचा फोटो पोस्ट केला आहे. तसेच निकाहनामाचा फोटो त्यांनी ट्वीट करत कबूल है, कबूल है, कबूल है.. यह क्या किया तुने समीर दाउद वानखेडे? असा सवालही मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.

दरम्यान काल मलिक यांची मुलगी सना मलिक-शेख (Sana Malik-Shaikh) यांनीही असेच एक ट्विट करत खळबळ उडवून दिली होती.सना यांनी समीर वानखेडे यांच्या एका कागदपत्राचा फोटो अपलोड करत हा फोटो समीर वानखेडे आणि शबाना कुरेशी यांचे कथित मॅरेज सर्टीफिकेट असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच २६ डिसेंबर २००६ रोजी हे सर्टीफिकेट जारी करण्यात आल्याचे यावर नमूद करण्यात आले आहे. सोबतच हे कथित मॅरेज सर्टिफीकेट ट्विटरवर अपलोड करताना सना मलिक यांनी पूर्ण सत्य जनतेसमोर देत आहे, असे कॅप्शन दिले होते. आता याचाच पुरावा मंत्री मलिक यांनी फोटो पोस्ट करत दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!