मुंबई: कोरोनाचा फटका आरोग्यव्यवस्थेमधील विविध यंत्रणांना बसला असतानाच आता महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये सर्वांत जास्त रक्त वाया गेले असून, महाराष्ट्राचा नंबर यात अग्रस्थानी असल्याचे स्पष्ट झाले आहे. कोरोनासंसर्गामुळे देशात २०२० मध्ये तीन लाख ४३ हजार ७८३ युनिट रक्त वाया गेले असून, राज्यात हे रक्त वाया जाण्याचे प्रमाण १५ टक्के म्हणजे ५२ हजार ३६४ युनिट होते. अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान यावरूनच भाजप नेते अतुल भातखळकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाना साधत टीका केली आहे.
कोरोना काळात रक्त वाया घालवण्यात देशात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रातल्या आरोग्य यंत्रणेचा किती बोजवारा उडाला आहे त्याचा हा उत्तम नमुना आहे. तुमचे रक्तदान तुमची जबाबदारी. अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे. असे ट्वीट करत भाजप नेते अतुल भातखळकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.
कोरोना काळात रक्त वाया घालवण्यात देशात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे.
महाराष्ट्रातल्या आरोग्य यंत्रणेचा किती बोजवारा उडाला आहे त्याचा हा उत्तम नमुना आहे.
तुमचे रक्तदान तुमची जबाबदारी. pic.twitter.com/Qknyg73wa7— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) November 22, 2021
दरम्यान रक्त वाया जाण्यात पश्चिम बंगालचा दुसरा क्रमांक लागतो. येथे ४५ हजार ८७२ युनिट रक्त वाया गेले असून, तामिळनाडू तिसऱ्या क्रमाकांवर आहे. येथे ४४ हजार ५५७ युनिट रक्त वाया गेले. या तिन्ही राज्यांमध्ये रक्त वाया जाण्याचे प्रमाण ४१.५ टक्के असल्याची माहिती केंद्र सरकारच्या डीजीएचएस विभागाने दिली आहे. रक्त मुदतबाह्य होण्याचा कालावधी हा ३५ दिवसांचा असतो. मात्र या कालावधीमध्ये रक्त वापरले गेले नाही तर त्यामध्ये काही घटकांचा समावेश करून हा कालावधी ४२ दिवसांपर्यंत नेता येतो.
महत्त्वाच्या बातम्या
- …तर आर्यन खान प्रकरण कशासाठी घडवले याचा तपास करावा लागेल- दिलीप वळसे पाटील
- ‘जे लोक हिंदुत्ववादी संघटनेशी संबंधित आहेत त्यांनाच जाणीवपूर्वक लक्ष्य केलं जातय’
- …तर साडेचारशे शेतकऱ्यांचे बळी गेले नसते, शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंचा मोदींना टोला!
- ‘इंदिरा गांधींनी खलिस्तान्यांना डासांप्रमाणे चप्पलेखाली चिरडलं अन्…’
- गरज पडल्यास रद्द केलेले कृषी कायदे पुन्हा आणू; भाजप खासदाराचं खळबळजनक वक्तव्य


