Share

‘सीएए, एनआरसी मागे घ्या नाहीतर…’, ओवैसींचा मोदी सरकारला इशारा

Published On: 

🕒 1 min read

उत्तर प्रदेश : कृषी कायदे मागे घेणार असल्याची घोषणा केल्यानंरही विरोधक आणि शेतकरी सरकारवर हल्लाबोल करत आहेत. एमएसपीच्या हमीशिवाय ते मान्य करणार नसल्याचे शेतकऱ्यांनी आधीच स्पष्ट केले आहे. तर दुसरीकडे एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी(Asduddin Owaisi) यांनीही मोदी सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. जर एनपीआर आणि एनआरसी कायदे कृषी कायद्याप्रमाणे रद्द केले नाहीत तर ते बाराबंकीला आणखी एक शाहीन बाग बनवतील असा इशारा ओवैसींनी मोदी सरकारला दिला आहे.

उत्तर प्रदेशच्या बाराबंकीमध्ये बोलत असतांना ओवैसी म्हणाले की,’मी पंतप्रधान मोदी(PM Narendra Modi) आणि भाजपाला कृषी कायद्यासारखे सीएए मागे घेण्याचे आवाहन करतो कारण ते संविधानाच्या विरोधात आहे. जर त्यांनी एनपीआर आणि एनआरसी वर कायदा केला तर आम्ही रस्त्यावर उतरू आणि इथे आणखी एक शाहीन बाग बांधली जाईल’, असे ओवैसी म्हणाले.

दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’पंतप्रधान मोदी हे देशातील सर्वात मोठे ‘नौटंकीबाज’ आहेत आणि चुकून ते राजकारणात आले आहेत, नाहीतर चित्रपटसृष्टीतील लोकांचे काय झाले असते. सर्व पुरस्कार मोदींनी जिंकले असते.’ तसेच तीन कृषी कायदे रद्द केल्याची घोषणा केल्यानंतर, पंतप्रधान म्हणाले होते की त्यांच्या ‘तपस्या’ (तपस्या) मध्ये काही कमतरता होत्या. आपले पंतप्रधान किती मोठे अभिनेते आहेत हे यावरून कळते,’ ते पुढे म्हणाले. खरी तपस्या शेतकऱ्यांनी त्यांच्या निदर्शनांमध्ये केली होती ज्यात सुमारे ७५० शेतकरी मरण पावले, असे ओवैसी यावेळी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!