🕒 1 min read
मुंबई : खासदार नवनीत राणा यांनी मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप केले होते. अनुसूचित जातीची आहे म्हणून भेदभाव करणारी वागणूक दिली, प्यायला पाणी दिले नाही, वॉशरुम वापरु दिले नाही, असे आरोप नवनीत राणा यांनी केले होते. याबाबत त्यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र देखील लिहिले आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांनी पुरावा देत नवनीत राणा यांच्या आरोपांचा भांडाफोड केला आहे.
मुंबई पोलिसांनी नवनीत राणांच्या आरोपांवर उत्तर दिले आहे. मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. यामध्ये राणा दाम्पत्य आरामात फॅन असलेल्या खोलीत बसले आहेत. सोबत चहा\कॉफी पित आहेत. टेबलवर पाणी बॉटल देखील आहेत. गप्पा देखील मारत आहेत. काही वेळापुर्वी गृह मंत्रालयाने देखील याबाबत स्पष्टीकरण दिलं होत. नवनीत राणा यांना हिन वागणूक देण्यात येत नसल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते.
Do we say anything more pic.twitter.com/GuUxldBKD5
— sp (@sanjayp_1) April 26, 2022
नवनीत राणांनी कोणते आरोप केले होते?
“मी केवळ मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर हनुमान चालिसा म्हणायची परवानगी मागितली होती. कोणत्याही धार्मिक भावना भडकावण्याचा माझा हेतू नव्हता. मी मुख्यमंत्र्यांना म्हटलं होतं की, तुम्हीही या, मात्र यामुळे कदाचित कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल म्हणून मी सांगितलं की मातोश्रीवर जाणार नाही. त्याऐवजी माझ्या खारमधील राहत्या घरीच हनुमान चालिसा म्हणणार आहे.”
“पोलिसांनी मला २३ तारखेला अटक केली. रात्रभर खार पोलीस स्टेशनमध्ये ठेवलं. त्यावेळी मी अनेक वेळा पिण्यासाठी पाणी मागितलं. तरी मला रात्रभर पाणी दिलं नाही. मला धक्का तर तेव्हा बसला जेव्हा मला पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी मी अनुसुचित जातीची असल्याने त्यांच्या भांड्यात पाणी मिळणार नाही, असं सांगितले. हा सरळसरळ माझा जातीवरुन केलेला अपमान आहे, मला रात्रभर बाथरुमही वापरु दिलं नाही. अत्यंत खालच्या दर्जाच्या भाषेत मला शिवीगाळ केली गेली. अनुसुचित जातीच्या लोकांना आम्ही आमचं बाथरुम वापरु देत नाही असे ते म्हणाले,” असा थेट आरोप नवनीत राणा यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
