🕒 1 min read
मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये चेन्नई सुपर किंग्ज (CSK) संघाचा लीगमधील ३८व्या सामन्यात पंजाब किंग्जने (PBKS) पराभव केला. महेंद्रसिंह धोनी, रवींद्र जडेजाने सजलेल्या चेन्नई संघाचा यंदाच्या हंगामात प्रवास कठीण होत चालला आहे. वानखेडेवर रंगलेल्या सामन्यात चेन्नईचा पंजाबकडून ११ धावांनी पराभव झाला. त्यांचा हा सहावा पराभव आहे. या पराभवामुळे त्याचा प्लेऑफमध्ये पोहोचण्याचा मार्गही कठीण झाला आहे. मात्र, अद्याप प्रवास संपलेला नाही. सीएसकेने ८ पैकी फक्त २ सामने जिंकले, तर ६ सामने गमावले आहेत.
आयपीएलच्या इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाचा यशस्वी संघ असलेल्या चेन्नईची अवस्था पाहता प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे, की यंदा चेन्नईचा प्रवास संपलाय का? ज्याचे उत्तर नाही असे आहे. चेन्नईला अजूनही प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याची संधी आहे. त्यांचा मार्ग सोपा नसला तरी अशक्यही नाही.
????#PBKSvCSK #WhistlePodu #Yellove ???????? pic.twitter.com/Dfa57nlDxN
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) April 25, 2022
सीएसकेने यापूर्वी ६ सामने गमावले आहेत, परंतु आता त्यांना प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत उर्वरित सामने जिंकावे लागतील. आधी चेन्नईला १४ गुणांची गरज होती, पण आता नवीन संघांसह चेन्नईला अव्वल ४ मध्ये प्रवेश करण्यासाठी उर्वरित सर्व ६ सामने जिंकणे आवश्यक आहे.
चेन्नईचे काम केवळ जिंकून होणार नाही, तर नेट रनरेटवरही लक्ष केंद्रित करावे लागेल. जरी सीएसकेने सर्व 6 सामने जिंकून गुण मिळवले, तर उर्वरित प्रतिस्पर्धी संघांसोबतचा सामना नेट रनरेटवर होईल. चेन्नईचा सध्याचा नेट रनरेट -०.५३४ आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
