🕒 1 min read
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी १ मे रोजी औरंगाबाद येथे सभा घेण्याची घोषणा केली होती. परंतु, या सभेला प्रशासनाने अद्याप परवानगी दिली नसल्याने संभ्रम कायम आहे. दरम्यान, या मुद्द्यावर आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी भाष्य केले आहे. तसेच कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर सरकार कारवाई करेल, असा इशारा देखील गृहमंत्र्यांनी दिला आहे.
यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना वळसे पाटील म्हणाले की,‘राज ठाकरे यांच्या सभेसंदर्भात एक दोन दिवसांत औरंगाबाद पोलीस आयुक्त निर्णय घेतील. याबाबत सरकार निर्णय घेणार नाही.’ तसेच कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर सरकार कारवाई करेल, असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, राज ठाकरेंच्या सभेपूर्वी औरंगाबाद शहरात २६ एप्रिल ते ९ मे या काळात पोलिसांकडून जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत, अशा आशयाची माहिती सकाळपासूनच समाजमाध्यमातून फिरत होती. परंतु, शहरामध्ये जमावबंदीच्या आदेशासंदर्भात कोणत्याही प्रकारचे आदेश काढण्यात आलेले नाही, असा खुलासा औरंगाबाद शहराचे पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “आता कितीही हिंदू हिंदू म्हणून ओरडलात तरी…,” मुख्यमंत्री ठाकरेंच्या टीकेवर मनसेचे प्रत्युत्तर
- IPL 2022 : ८ सामन्यांमध्ये ६ पराभव..! स्पर्धेबाहेर गेलाय का CSK संघ? नक्की वाचा!
- “पुढची २५ वर्ष फडणवीस…” ; संजय राऊतांची मोठी भविष्यवाणी
- जमावबंदीचे आदेश नाहीत, औरंगाबाद पोलीस आयुक्तांचा खुलासा
- “…माथेफिरू ओठाच्या खाली टोमॅटो सॉस लावून फिरतो”- संजय राऊत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
