Share

IPL 2022 PBKS vs CSK : गब्बरची बातच न्यारी..! एकाच सामन्यात शिखर धवननं रचले ५ विक्रम!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये पंजाब किंग्जचा सलामीवीर शिखर धवन (Shikhar Dhawan) याने चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या (PBKS vs CSK) सामन्यात एक-दोन नव्हे तर पाच विक्रम केले आहेत. डावखुरा फलंदाज शिखर धवनने चेन्नईविरुद्ध नाबाद ८८ धावांची खेळी केली. त्याने आपल्या खेळीत ९ चौकार आणि २ षटकारांची आतषबाजी करत ८८ धावा केल्या. हा धवनचा २००वा सामना होता. या सामन्यात ६००० धावा करणारा तो दुसरा फलंदाज ठरला. याव्यतिरिक्त टी-२० क्रिकेटमध्ये भारतासाठी ९००० धावा करणारा तो तिसरा फलंदाज ठरला. सामना संपेपर्यंत डावाच्या अखेरीस त्याने आणखी दोन विक्रम केले.

शिखर धवन आयपीएलमधील २००वा सामना खेळताना मोठी धावसंख्या करणारा खेळाडू ठरला आहे. यात त्याने रोहित शर्माला मागे टाकले, तर शिखर धवनने आयपीएलमध्ये एका संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही केला आहे. त्याने चेन्नईविरुद्ध १०००हून अधिक धावा केल्या आहेत. त्याच्याआधी रोहित शर्मा आणि डेव्हिड वॉर्नर हा विक्रम करू शकले आहेत. यापूर्वी २००व्या सामन्यात रोहित शर्माने सर्वात मोठी खेळी खेळली होती. हिटमॅनने ६८ तर दिनेश कार्तिकला ४० धावा करता आल्या. याशिवाय शिखर धवनने सीएसकेविरुद्ध १०२९ धावा केल्या आहेत. कोणत्याही फलंदाजाने संघाविरुद्ध इतक्या धावा केल्या नाहीत. रोहितने केकेआरविरुद्ध १०१८ तर वॉर्नरने पंजाबविरुद्ध १००५ धावा केल्या आहेत.

असा रंगला सामना…

सलामीवीर शिखर धवनच्या शानदार खेळीनंतरच्या तगड्या गोलंदाजीमुळे पंजाबने हा सामना जिंकला. या हंगामातील ३८व्या सामन्यात पंजाब किंग्जने २० षटकात ४ गडी गमावून १८७ धावा केल्या. प्रत्युत्तरात चेन्नई सुपर किंग्जला ६ विकेट्सवर १७६ धावाच करता आल्या. पंजाबकडून धवनने ८८ धावांची नाबाद खेळी खेळली आणि भानुका राजपक्षेसोबत दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. त्याचबरोबर कगिसो रबाडा आणि ऋषी धवन या वेगवान गोलंदाजांनी २-२ तर संदीप शर्मा, अर्शदीप सिंग यांनी १-१बळी घेतला.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!