Share

“आता कितीही हिंदू हिंदू म्हणून ओरडलात तरी…,” मुख्यमंत्री ठाकरेंच्या टीकेवर मनसेचे प्रत्युत्तर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : काल (२५ एप्रिल) मुंबईमध्ये ‘बेस्ट’ बसच्या नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलत असतांना मुख्यमंत्री ठाकरेंनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला. दरम्यान, यावरून आता मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.

यासंदर्भात संदीप देशपांडे यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘अजान ची स्पर्धा भरवणारे, हनुमान चालीसा ला विरोध करणारे नव पुरोगामीच आणि नव पुरोगाम्यांना आपण हिंदू आहोत याची जाणीव करून देणारे राजसाहेबच.’ तसेच आता कितीही हिंदू हिंदू म्हणून ओरडलात तरी “बुंदसे गयी वो हौद से नहीं आती”, असा टोला देशपांडे यांनी मुख्यमंत्री ठाकरेंना लगावला आहे.

दरम्यान, काल बोलत असतांना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले होते की,‘ताळतंत्र थोडसं सोडायला काय हरकत आहे. म्हणे शिवसेनेने हिंदुत्व सोडलं आहे. हिंदुत्व म्हणजे धोतर आहे का?बाबरी पडली तेव्हा तुम्ही बिळात लपला होतात. आम्हाला हिंदुत्व शिकवत आहात तर तुमचे हिंदुत्व आहे कुठे?.’ तसेच घंटाधारी हिंदुत्ववाद्यांनी गदाधारी हिंदुत्ववाल्यांना शिकवू नये,आमचे हिंदुत्व हे हनुमानाच्या गदेसारखे आहे, असेही ते यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!