मुंबईः फोर्ब्सने जगातील सर्वाधिक श्रीमंत 10 व्यक्तींची यादी जाहीर केली. यात आशिया खंडातून केवळ उद्योगपती मुकेश अंबानी यांना स्थान मिळाले आहे. भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी जगातल्या सर्वाधिक श्रीमंतांमध्ये सातव्या स्थानावर पोहोचले आहेत. प्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरन बफे आणि गूगलचे लेरी पेज-सर्जी ब्रिन यांना मागे टाकत मुकेश अंबानी यांनी हे स्थान पटाकावले.
फोर्ब्सनुसार रिलायन्स इंडस्ट्रीचे प्रमुख मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती 70 अरब डॉलर झाली आहे. मुकेश अंबानींच्या रिलायन्सचे बाजारातील मूल्य १२ लाख कोटींपेक्षा जास्त झाले आहे. शेअर बाजारात १२ लाख कोटींपेक्षा जास्त मूल्य असलेली रिलायन्स ही पहिली कंपनी आहे.
फोर्ब्सच्या आकडेवारीनुसार, मुकेश अंबानी यांची संपत्ती ७० अब्ज डॉलर एवढी झाली आहे. फोर्ब्स रिअल टाइम आकडेवारीसह यादी अपडेट करते, त्यासाठी दर पाच मिनिटांनी शेअर बाजारातील वेगवेगळ्या कंपन्यांचे बाजार मूल्य बघितले जाते.
रिलायन्स आणि बीपी यांच्यातल्या सहकार्य करारामुळे मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत वाढ झाली आहे. रिलायन्स कंपनीच्या शेअरचे दर वधारले आहेत. शेअर बाजारात रिलायन्सच्या शेअरचे मूल्य १,८८०.२० रुपये झाले आहे.
महाराजांनी मनं जिंकलं : कोरोनातून बरे होताच दान केला प्लाझ्मा
‘पुढच्या वर्षी जनतेच्या मनातला, जनतेच्या मतातला मुख्यमंत्री पांडुरंगाची ‘विधीवत’ महापूजा करेल’
‘बाळासाहेबांची विचारधारा, कामाची पद्धत भाजपच्या विचाराशी सुसंगत होती असं मला कधी वाटलंच नाही’
शिवसेना नसती तर भाजपचे 40-50 आमदारच निवडून आले असते – शरद पवार
लॉकडाऊन केला नसता तर न्यूयॉर्कसारखी अवस्था झाली असती; पवारांनी केला ठाकरेंचा बचाव
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

