Share

एकनाथ शिंदे आणि मुकेश अंबानी यांची रात्री उशिरा बंद दाराआड भेट, राजकीय चर्चांना उधाण

Published On: 

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांची रात्री उशिरा वर्षावर भेट झाली असल्याची माहिती आहे. ही भेटीत जवळपास दीड तास चर्चा झाली. या भेटीवेळी मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी आणि शिंदे गटाचे नेते किरण पावस्कर देखील उपस्थित होते. रात्री १२.१५ वाजता अंबानी वर्षा बंगल्यावरून बाहेर पडताना दिसले.

उद्धव ठाकरे आणि गौतम अदानी यांची भेट :

माजी मुख्यमंत्री तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि उद्योगपती गौतम अदानी यांची भेट देखील दोन दिवसांपुर्वी झाली होती. महाविकास आघाडी सरकार काळात धारावी पुनर्विकासासाठी काही बैठका घेण्यात आल्या होत्या. या प्रकल्पासाठी अदानी उद्योग समूहाचे नाव चर्चेत होतं.

शिंदे-अंबानी यांची भेटः

यादरम्यान, झालेल्या शिंदे-अंबानी भेटीमुळे राजकीय वर्तूळात चर्चांना उधाण आलं आहे. या भेटीमध्ये काय चर्चा झाली, हे अद्यापही समोर आलेलं नाही.

दरम्यान, शिंदे आणि अंबानी यांची भेट ही राज्यातील प्रकल्पांच्या दृष्टीने असल्याचं म्हटलं जात आहे. वेदांता प्रकल्प नुकताच हातून गेला आहे. अशातच या भेटी होत आहेत. त्यामुळे आता अंबानी यांचा एखादा मोठा प्रकल्प राज्यात येणार का याबाबतही चर्चा केली जात आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!