Share

‘पुढच्या वर्षी जनतेच्या मनातला, जनतेच्या मतातला मुख्यमंत्री पांडुरंगाची ‘विधीवत’ महापूजा करेल’

Published On: 

मुंबई- मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार, मीच पुढच्या वर्षी आषाढी यात्रेला पांडुरंगाची सरकारी पूजा करणार म्हणत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषणबाजी केली, पण त्या पांडुरंगालाच त्यांची पूजा मान्य नव्हती, यामुळे त्यांच्या पक्षाचे सरकार गेले आणि मुख्यमंत्रिपदही, अशा शब्दांत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चिमटा काढला आहे.

पंधराव्या वित्त आयोगातून पंचायत समिती व जिल्हा परिषद यांना भरीव निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल हसन मुश्रीफ यांचा जिल्हा परिषद सदस्यांनी सत्कार केला. यावेळी झालेल्या कार्यक्रमात मुश्रीफ यांनी राजकीय टोलेबाजी केली.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार यावे, उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री व्हावेत असे, त्या पांडुरंगालाच वाटत असावे, म्हणून तर आम्ही सत्तेवर आलो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पूजा व्हावी असे पांडुरंगाला वाटत असल्याने ती ठाकरेंच्या पूजेने पूर्ण झाली, असा टोलाही मुश्रीफ यांनी मारला.

आता भाजपने देखील मुश्रीफ यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले यांनी इच्छा मुश्रीफ यांना चांगलंच झापलं आहे.’महाराष्ट्र देशा’ला दिलेल्या प्रतिक्रियेत भोसले म्हणतात, हसन मुश्रीफजी,देवेंद्रजी फडणवीस यांना सलग पाच वर्षे पांडुरंगाची विधीवत महापूजा करण्याचे भाग्य लाभले. यात ४ वर्ष थेट पंढरपूरात जाऊन तर १ वर्ष शासकीय निवासस्थानातून त्यांनी महापूजा केली.पण जनतेचा विश्वासघात करुन, जनमताचा अनादर करुन, अनैतिकतेने महाआघाडीचं सरकार अस्तित्वात आणलं गेलं या पापामुळेच पांडुरंगाने मा. मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे जी यांच्या हस्ते विधीवत महापूजा घडूच दिली नाही, त्यांना गाभार्यातच बसून ठेवले. महापूजेतले विधी,उपचार त्यांच्या हस्ते होऊच दिले नाहीत, फक्त फोटो सेशन करण्यात आले.

ज्यांच्या वृत्तपत्रातून ‘देव मैदान सोडून पळाले’ ही भाषा करण्यात आली त्याची शिक्षा म्हणुन एका युवा मंत्र्याला महापूजा सुरु असतानाच मंदिर सोडून पळावे लागले असे दोन चमत्कार पांडुरंगानेच दाखवले आहेत.तुम्ही काळजी करु नका, पुढच्या वर्षी जनतेच्या मनातला, जनतेच्या मतातला मुख्यमंत्री पांडुरंगाची ‘विधीवत’महापूजा करेल. तुम्हालाही हे कळाल्यामुळेच तुम्ही कोरोनाच्या संकटात लोकांचे ‘डोळे पांढरे करणारे पॅकेज’ देण्याचा विचार सोडून या संकटात सुद्धा स्वतःचे सत्कार उरकून घेत आहात असा टोला भोसले यांनी लगावला आहे.

शिवसेना नसती तर भाजपचे 40-50 आमदारच निवडून आले असते – शरद पवार

‘बाळासाहेबांची विचारधारा, कामाची पद्धत भाजपच्या विचाराशी सुसंगत होती असं मला कधी वाटलंच नाही’

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!