Share

शिवसेना नसती तर भाजपचे 40-50 आमदारच निवडून आले असते – शरद पवार

Published On: 

मुंबई : शिवसेना नसती तर भाजपचे 40-50 आमदारच असते. मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन हा चेष्टेचा विषय झाला”, असा टोमणा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मॅरेथॉन मुलाखत घेतली. या मुलाखतीत शरद पवार यांनी फडणवीस यांना टोमणा हाणला आहे.

लोकशाहीमध्ये १०५ जागा असणारा प्रमुख पक्ष राज्यात सरकार स्थापन करु शकला नाही. यासंदर्भात तुमचं काय मत आहे,” असा प्रश्न राऊत यांनी शरद पवारांना विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना पवारांनी भाजपाने १०५ पर्यंत कशी मजल मारली हे पाहणं महत्वाचं असल्याचं म्हटलं आहे. “मुळात प्रमुख पक्ष प्रमुख कसा झाला याच्या खोलात जायला पाहिजे. माझं स्पष्ट मत आहे, १०५ हा जो आकडा आहे त्यामध्ये शिवसेनेचं योगदान फार मोठं होतं. त्यामध्ये शिवसेना सहभागी नसती. किंवा शिवसेनेला त्यामधून वजा केलं तर तो १०५ जागांचा आकडा ४०-५० च्या आसपास असता. भाजपाचे काही नेते जे १०५-१०५ असं सांगत आम्ही १०५ असतात. मात्र त्यांना १०५ वर पोहचवण्याचं काम ज्यांनी केलं त्यांनाच जर गृहित धरण्याची भूमिका घेतली तर मला वाटतं नाही वेगळं काही करण्याची गरज होती,” असं मत पवारांनी व्यक्त केलं आहे.

संतापजनक : निर्लज्ज जोशुआ नंतर केतकी चितळेनी पाजळली अक्कल, महाराजांचा केला एकेरी उल्लेख

शिवसेना नसती तर भाजपचे 40-50 आमदारच असते. ‘मी पुन्हा येईन’ म्हणण्यामध्ये दर्प होता. मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन हा चेष्टेचा विषय झाला. राजकीय नेत्याने जनतेला गृहीत धरु नये. भाजपचे ‘आता आम्हीच’ हे लोकांना आवडले नाही. अस देखील या मुलाखतीत शरद पवार म्हणाले आहेत.

मनसेचा निर्लज्ज जोशुआला ‘खळ खट्याक’ दणका, जिथं महाराजांचा अपमान झाला ते थेएटरच फोडलं

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!