मुंबई : आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषेदेत त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोरोना झाल्याच्या पार्श्वभूमोवार आणि त्यांच्या मास्क न घालण्याच्या सवयीवरून, वक्तव्य केले होते. “राज ठाकरे हे मास्क वापरात नव्हते, आता त्यांना दुसऱ्यांदा कोरोना झाला. त्यांची शस्रक्रिया ही रखडली,” असे अजित पवार म्हणाले होते. आता यावर मनसेचे नेते संदिप देशपांडे यांनी अजित पवारांना प्रत्युत्तर दिले आहे.
संदीप देशपांडे म्हणाले, “अर्धवट माहितीच्या आधारे उपमुख्यमंत्र्यांनी तरी बोलू नये. अजित पवार मास्क घालून फिरतात त्यांनाही कोरोना झाला. राज ठाकरे यांना कोरोना झालेला नाही, त्यांच्यामध्ये कोरोनाचे डेड सेल्स आढळले आहेत. ही गोष्ट त्यांनी लक्षात घेतली पाहिजे. अर्धवट माहितीच्या आधारे उपमुख्यमंत्र्यांनी तरी बोलू नये, असा टोला मनसे नेते संदीप देशपांडे यांनी अजित पवार यांना लगावला.
यावेळी त्यांना शिवसेना आणि सरकार वरही टीका केली. “शिवसेनेचं राज्य म्हणजे काय तालिबानी राज्य आहे का? मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल पत्र प्रसिद्ध केलं होतं, हे पत्र घरोघरी वाटण्याचा आव्हान मनसे कार्यकर्त्यांना केलं. मुंबईतही पत्रक वाटताना पोलिसांनी काही ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. पोलिसांची ज्या पद्धतीचे मनमानी दादागिरी व हुकूमशाही चाललेली आहे ती निषेधार्ह आहे. पत्रके वाटणे चुकीचे आहे का? असा सवाल त्यांनी केला.
शिवसेनेच्य लोकांनी काही केलं तरी चालतं. वरून सरदेसाई यांनी पोलिसांना शिव्या घातल्या तरी चालतात. आम्ही पत्रक वाटलं तर आम्हाला ताब्यात घेतलं. हुकूमशाही आहे का ? शिवसेनेचं राज्य म्हणजे काय तालिबानी राज्य आहे का? असा सवाल केला देशपांडे यांनी केला.
महत्त्वाच्या बातम्या :


