Share

“मराठी चित्रपटही साऊथ चित्रपटाप्रमाणे भव्य दिसतोय…” सलील कुलकर्णीची ‘ती’ पोस्ट चर्चेत

Published On: 

🕒 1 min read

मुंबई :  अभिनेते प्रवीण तरडे यांचा ‘सरसेनापती हंबीरराव’ हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाची सगळीकडे जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कथा प्रेक्षकांना पहायला मिळत आहे. या चित्रपटाचे सगळीकडे कौतुक केले जात आहे. नुकतंच प्रसिद्ध गायक, लेखक व संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी यांनी यानिमित्ताने एक पोस्ट शेअर केली आहे.

सलील कुलकर्णी यांनी सोशल मिडीयावर प्रवीण तरडे यांच्यासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. फोटो शेअर करत कॅप्शन लिहिताना प्रवीण तरडे यांचे कौतुक केले आहे. त्याचसोबत ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाचे देखील विशेष कौतुक केले आहे.

डॉ. सलील कुलकर्णी यांची पोस्ट-

प्रवीण विठ्ठल तरडे .. त्रिवार अभिनंदन ..

मराठी चित्रपटाचा परीघ मोठा केला आमच्या या मित्राने … एका वेळी सगळ्या थिएटर्स ला दोन भव्य चित्रपट एका दिग्दर्शकाचे असणं ही एक अद्भुत घटना आहे.  आमच्या मैत्रीचा प्रवास १९९८ – १९९९ पासूनचा .. प्रवीणला कोणतीही गोष्ट करतांना पाहिली कि एक गोष्ट जाणवते .. हा माणूस त्या त्या वेळेला तिथे तिथे १०० नाही २००% असतो.

लिखाण , दिग्दर्शन ,  अभिनय , डबिंग , रेकॉर्डिंग , गप्पा , मैत्री .. सगळीकडे भरभरून जगणारा प्रवीण .. ग्रेसच्या कवितेपासून .. क्रिकेट पर्यंत आणि चित्रपट तर त्याचा श्वास आहे .. रंगमंचावर त्याची भक्ती आहे म्हणूनच ..  कास्टिंग करतांना त्याचा पहिला प्रश्न असतो .. तुम्ही थिएटर केलंय का?

आपल्या मित्रांना बरोबर घेऊन यशाची प्रत्येक पायरी चढणं हा गुण सुद्धा तितकाच मोठा .. ” धर्मवीर ” पाहून त्याच्यामधल्या दिग्दर्शकाला सलाम केला ..  आणि ” सरसेनापती हंबीरराव ” पाहून एक मित्र म्हणून .. एक मराठी कलाकार म्हणून मन अभिमानाने भरून आलं ..

आता मराठी चित्रपट सुद्धा साऊथ इंडियन फिल्म्स सारखा भव्य दिसतोय .. इतर भाषेतले दिग्दर्शक सुद्धा आता ” प्रवीण तरडे”  सारखे चित्रपट करा असं म्हणतील ह्याची खात्री वाटते.

प्रवीण .. मित्रा  .. खूप अभिमान आहे तुझ्या या प्रवासाबद्दल .. प्रत्येक टप्प्यावर कष्ट घेत इथपर्यंत आला आहेस हे तुझ्या सगळ्या मित्रांना ठाऊक आहे .. नवीन लोकांच्या पाठीशी उभा राहतोस तेव्हा तू त्यांच्यात तुझे struggle चे दिवस पाहतोस .. हे सुद्धा जाणवतं … तुझ्यातल्या कलाकाराला वंदन आणि मित्राला एक घट्ट मिठी .. !! अशाप्रकारे सलील कुलकर्णी यांनी पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सध्या सगळीकडे चांगलीच चर्चेत आहे.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!