मुंबई : राज्यमंत्री बच्चू कडू आपल्या सडेतोड आणि बिनधास्त राजकीय वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. मागील काही दिवसांपासून बच्चू कडू अनेकदा माध्यमांसमोर येऊन आपली भूमिका मांडताना दिसत आहेत. त्यांनी राणा दाम्पत्यावरही टीका केली, नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळाला ८ वर्ष पूर्ण होण्याच्या पार्श्वभूमीवरही त्यांनी टीका केली होती. तर केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होतोय, या मुद्द्यावरही त्यांनी रोकठोक भूमिका घेतली होती. आता बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा मोदींवर टीका केली आहे.
नरेंद्र मोदींच्या कार्यकाळाला आता आठ वर्ष पूर्ण होत आहेत. याच पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. बच्चू कडू म्हणाले, “नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान झाल्याने मंदिर, मस्जिदचा प्रश्न मिटला. पण गडकरी चांगले व्यक्ती आहेत, ते पंतप्रधान झाले असते तर लोकांच्या रोजी रोटीचा प्रश्न मिटला असता” एकीकडे भाजपचे नेते नितीन गडकरींवर स्तुतीसुमने उधळताना बच्चू कडू यांनी मोदींवर जोरदार टीका केली आहे.
मोदी यांनी पहिल्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली या घटनेला ३१ मे रोजी आठ वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्ताने भाजप आणि भाजपच्या नेत्यांकडून नरेंद्र मोदींच्या कामाची स्तुती करण्यात येत आहे, तर विरोधकांकडून मात्र मोदींवर टीका होत असताना दिसून येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

