🕒 1 min read
मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये आज राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात फायनल सामना रंगणार आहे. या सामन्यापूर्वी राजस्थानचा गोलंदाज ट्रेंट बोल्टचा एक व्हिडिओ चर्चेत आला आहे. खरे तर हा व्हिडिओ रॉ़यल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या क्वालिफायर २ सामन्यानंतरचा आहे. बोल्ट एका छोट्या चाहत्याला स्टेडियममध्ये आपल्या अंगावरची जर्सी भेट म्हणून देतो. सामना संपल्यानंतर बोल्ट ड्रेसिंग रूमच्या दिशेने चालला होता आणि एक छोटा चाहता चिअर करताना बोल्टला दिसला.
यानंतर बोल्ट तिथे थांबला आणि त्याच्याशी बोलला. संवाद झाल्यानंतर बोल्टने आपली जर्सी काढली आणि ती त्या चाहत्याला दिली. मात्र, सुरक्षेसाठी तिथे गेट असल्यामुळे त्याने आपल्या टीमच्या एका कर्मचाऱ्याची मदत घेतली आणि त्याला जर्सी मुलापर्यंत पोहोचवण्यास सांगितले. जर्सी मुलाकडे पोहोचताच त्याने लगेच आरसीबीचा टी-शर्ट काढला आणि बोल्टने दिलेली जर्सी घातली. राजस्थानने त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
https://www.instagram.com/p/CeF0iD-lvAh/
बोल्टने या मोसमात चांगली गोलंदाजी केली असून राजस्थानला अंतिम फेरीत नेण्यात त्याचा मोलाचा वाटा आहे. दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात, बोल्टने ग्लेन मॅक्सवेलची महत्त्वपूर्ण विकेट घेतली, जो चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता. बोल्टने या मोसमात खेळल्या गेलेल्या १५ सामन्यांमध्ये १५ विकेट घेतल्या आहेत. या दरम्यान त्याने ८.२४च्या इकॉनॉमीवर धावा खर्च केल्या आहेत. बोल्ट पॉवरप्लेमध्ये धोकादायक गोलंदाजीसाठी ओळखला जातो. आज रात्री गुजरात टायटन्सविरुद्धच्या अंतिम सामन्यातही तो खूप महत्त्वाचा भूमिका बजावण्यास तयार असेल.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
