पुणे : देशात सध्या दिलासा घोटाळा सुरु आहे. त्याला विविध कंगोरे आहेत. गुन्हे किंवा आरोप फक्त आमच्यावर सिद्ध होतात. इतरांवर ते का सिध्द होत नाहीत, हा संशोधनाचा विषय असल्याचे शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले आहेत. ते पुण्यात बोलत होते. शिवसेना मेळ्याव्यानिमित्त ते शहरात आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. देशात ज्या प्रकारची राजवट सुरु आहे. त्यावरून वाटते की, देशात इंग्रजांची राजवट सुरु आहे, असे संजय राऊत म्हणाले.
नवनीत राणा यांना राज्य सरकारकडून मिळालेल्या वागणुकीवरून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सवाल उपस्थित केला होता. यावर संजय राऊत यांना प्रश्न विचारले असता, राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका करत म्हणाले, इंग्रजांची राजवट यांच्यापेक्षा बरी होती, अशी टीका त्यांनी केली.
बाळासाहेब ठाकरे यांच्या अनेक ऐतिहासिक सभा औरंगाबाद शहरातील ज्या मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर झाल्या, काल तिथे कोणाची तरी सभा झाली म्हणून ती शिवसेनेची सभा होत नाही. तर गर्दीने ओसंडून जाणाऱ्या सभा तिथे घेतल्या जातील, असेही संजय राऊत म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

