Share

राज ठाकरे यांच्या नातवाचं नाव ठरलं, जाणून घ्या काय आहे नाव…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज ठाकरे यांच्या नातवाचा नामकरण सोहळा म्हणजे बारसं, आज त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी पार पडला. राज यांचे चिरंजीव अमित ठाकरे आणि सून मिताली यांच्या मुलाला आज नाव देण्यात आलं. हेच नाव आता शिवतीरर्थावर घुमणार आहे.

‘शिवतीर्थ’ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी आज अमित ठाकरे आणि त्यांच्या पत्नी मिताली यांच्या मुलाचा नामकरण सोहळा पार पडला. ठाकरे घराण्याच्या पाचव्या पिढीचा वारसदार असलेल्या या बाळाचं नाव ‘किआन’ असं ठेवण्यात आलं आहे. गेल्या महिन्यात ५ एप्रिल रोजी ठाकरे घराण्यात नव्या सदस्याचं आगमन झालं होतं. ५ एप्रिल रोजी मिताली ठाकरे यांनी मुलाला जन्म दिला.

बाळाच्या जन्मामुळे ठाकरे कुटुंबीय आनंदी असल्याची भावना राज ठाकरे तसंच त्यांच्या पत्नी शर्मिला यांनी व्यक्त केली होती. एका मुलाखतीत बोलताना राज ठाकरे यांनी आपल्या मुलाच्या वेळी ज्या गोष्टी करता आल्या नाहीत, त्या नातवासोबत करायला मिळणार याचा आनंद व्यक्त केला होता. तर बाळाच्या नावाबद्दल मिश्किल भाष्यही केलं होतं. आपण बाळाचं नाव प्रदीप ठेवणार आहोत, तर अमितने बाळाचं नाव भालचंद्र ठेवायचं ठरवल्याचंही राज ठाकरे चेष्टेने म्हणाले होते.

महत्त्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!