🕒 1 min read
पुणे : मुंबई सत्र न्यायालयानं राणा दाम्पत्याला जामीन देताना एक महत्वाचं निरीक्षण नोंदवलं आहे. नवनीत राणा आणि रवी राणा या दाम्पत्यावर लावण्यात आलेलं राजद्रोहाचं कलम चुकीचं असल्याचं मुंबई सत्र न्यायालयानं म्हंटलं आहे. याबाबत बोलताना संजय राऊत यांनी न्यायालयाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.
“या राज्यात किंवा देशात सध्या जो दिलासा घोटाळा सुरू आहेत त्यामध्ये अनेक कंगोरे आहेत. गुन्हे किंवा आरोप हे फक्त आमच्यावरील सिद्ध होतात,” असे संजय राऊत म्हणाले. पुढे राज ठाकरेंनी औरंगाबाद मध्ये जिथे सभा घेतली त्या मैदानावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सभा घेणार आहेत का? असा पत्रकारांनी प्रश्न विचारला असता राऊत म्हणाले, “तुमची माहिती चुकीची आहे. या मैदानावर काल झालेली सभा पहिलीच नव्हती. औरंगाबादमधील मैदानावर याआधी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून शिवसेनेच्या अनेक मोठ्या नेत्यांच्या सभा झालेल्या आहेत”.
भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ‘हे सरकार बहुजनांचं असल्याचा दावा खोटा आहे’, असं म्हणत महाविकास आघाडीवर निशाणा साधला होता. या टीकेवर संजय राऊत यांनी यावेळी जोरदार प्रत्युत्तर दिले. म्हणाले, “आमच्यावर टीका करणाऱ्यांची भूमिका काय आहे, त्यांचं राजकारण आणि समाजातील स्थान काय आहे? त्यांनी उगाच उचलली जीभ आणि लावली टाळ्याला, असं करू नये”. अशा शब्दांत फटकारलं.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
