Share

“भविष्यात आम्हाला मोठी किंमत…”; जितेंद्र नवलानी गुन्हा प्रकरण राऊतांची प्रतिक्रिया

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जितेंद्र चंद्रलाल नवलानी यांच्यावर अनेक आरोप केले होते. जितेंद्र नवलानी हे अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीचे वसुली अधिकारी म्हणून काम करत आहेत. त्यांना सध्या दिल्लीत पदोन्नती मिळाली आहे. जितेंद्र नवलानी हे ७ कंपन्याचे संचालक असून त्यांनी या सात कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या बिल्डर्सनी शेकडो कोटी रुपये ट्रान्सफर केले आहेत. असा थेट आरोप राऊतांनी केला होता.

आता महाराष्ट्र पोलिसांच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जितेंद्र नवलानी हे अंमलबजावणी संचालनालय अधिकार्‍यांच्या सांगण्यावरून काम करत असल्याचा दावा करून अनेक व्यावसायिकांकडून सुमारे ५९ कोटी रुपये गोळा केल्याप्रकरणी गुन्हा जितेंद्र नवलानी यांच्या विरोधात नोंदवला आहे.

यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले, “महाराष्ट्र पोलिसांना काम करु द्या. त्यामध्ये जे सत्य असेल ते योग्यवेळी बाहेर येईल. जितेंद्र नवलानी आणि इतरांवर जे आरोप आहेत ते केंद्रीय तपास यंत्रणांच्या संदर्भात आहेत. देशभरात तपास यंत्रणांचे जे काम चालू त्यासंदर्भात सत्य बाहेर आणण्याचे काम चालू आहे. त्याची भविष्यामध्ये आमच्या सारख्या लोकांना फार मोठी किंमत चुकवावी लागेल याची आम्हाला माहिती आहे”.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!