Raj Thackeray | मुंबई : महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील वाद वाढत चालला आहे. दोन राज्यांमधील हा वाद पाच दशकांहून अधिक जुना आहे. त्यामुळे राजकारणही होत आहे. अशातच बेळगाव येथे महाराष्ट्राच्या ट्रकवर दगडफेक करण्यात आली आहे. बेळगावजवळ हिरेबागवाडी टोल नाक्याजवळ कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांना सूचक इशारा दिला आहे.
“कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना कलह हवाय आणि त्यासाठी महाराष्ट्राला जाणूनबुजून लक्ष्य केलं जातंय. महाराष्ट्राने जे काही मिळवलं आहे ते संघर्ष करून मिळवलं आहे त्यामुळे संघर्षाला आम्ही तयार असतो. पण तो होऊ नये असं वाटत असेल तर आता केंद्राने लक्ष घालावं”, असं म्हणत राज ठाकरे यांनी ट्विटर आणि फेसबुकवर एक पत्रही पोस्ट केलं आहे.
काय म्हटलंय पत्रात?
‘मी मध्यंतरी बोललो तसं, महाराष्ट्र-कर्नाटकाचा सीमावाद उफाळून यावा, ह्यासाठी पुन्हा कोणाकडून तरी प्रयत्न सुरु झाले आहेत. तिकडून कोण खतपाणी घालतंय हे तर उघड दिसतंय, पण इथे कोण ह्याला खतपाणी घालत आहे का? हे सरकारने पहायला हवं. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आता जरा तोंडावर आवर घालावा आणि हा प्रश्न चिघळू देऊ नये. महाराष्ट्राच्या गाड्यांची तोडफोड, तिथल्या मराठी माणसांना त्रास असले प्रकार सुरु आहेत ते तत्काळ थांबवा.’
कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना कलह हवाय आणि त्यासाठी महाराष्ट्राला जाणूनबुजून लक्ष्य केलं जातंय. महाराष्ट्राने जे काही मिळवलं आहे ते संघर्ष करून मिळवलं आहे त्यामुळे संघर्षाला आम्ही तयार असतो. पण तो होऊ नये असं वाटत असेल तर आता केंद्राने लक्ष घालावं. #अखंडमहाराष्ट्र pic.twitter.com/2Rq1XCGGHz
— Raj Thackeray (@RajThackeray) December 7, 2022
तर आमचं उत्तर पण तितकंच तीव्र असेल
याशिवाय ‘हा प्रश्न चर्चेने आणि सामोपचारानेच सुटायला हवा, पण जर समोरून संघर्षाची कृती केली जाणार असेल तर, मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना काय करू शकते ह्याची चुणूक माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी दाखवली आहे. त्यामुळे गरज पडली तर आमचं उत्तर पण तितकंच तीव्र असेल हे विसरू नका. येणाऱ्या २०२३ च्या कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकांसाठी हा मुद्दा उकरून काढला जातोय आणि महाराष्ट्राला नाहक छळलं जातंय. माझं मराठी बांधवांनाही हे सांगणं असेल की त्यांना जे हवंय ते नाही द्यायचं आपल्याला जे हवंय तेच आपण करायचं.’ असंही राज ठाकरेंनी पात्रात नमूद केलंय.
याचबरोबर ‘अचानकपणे चहुबाजुंनी राज्याच्या सीमांवर दावा सांगितला जातोय, हे प्रकरण साधंसोपं नाही, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या भूमीकडे येणारी बोटं पिरगळली जातील हे बघावं. इथे आपण कुठल्या पक्षाचे आहोत हे विसरून, महाराष्ट्राचे आहोत हे स्मरून कृती व्हावी अशी अपेक्षा. केंद्र सरकारनेही ह्या प्रश्नात वेळीच लक्ष घालावे आणि हा वाद चिघळणार नाही हे पहावं.’ असा इशारा राज ठाकरे यांनी दिलाय.
‘मी पुन्हा सांगतो कर्नाटक आणि महाराष्ट्र ह्यांच्यात कमालीचा एकजिनसीपणा आहे, आज इथल्या अनेकांची कुलदैवतं कर्नाटकात आहेत तर अनेक कन्नडिगांची कुलदैवतं महाराष्ट्रात आहेत. थोडक्यात दोन राज्यांतील बंध हा मजबूत आहे. त्यामुळे संघर्ष होऊच नये. पण तरीही जर समोरून कर्नाटकाची भाषा निव्वळ आव्हानाची असेल तर ते स्वीकारायला महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि इथली मराठी जनता तयार आहे. संघर्ष न होण्यात आणि मैत्र टिकण्यातच सर्वांचं हित आहे.’ असं शेवटी राज ठाकरेंनी पत्रात सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Sushma Andhare | देवेंद्र फडणवीसांनी पंकजा मुंडेंचे राजकारण संपवण्याचा घाट घातला – सुषमा अंधारे
- Sushma Andhare | “शेळीने उंटाचा मुका…” ; सुषमा अंधारेंचा मनसेला टोला
- Rohit Pawar | “अंधारात आमदारांना सुरतला पाठवता येऊ शकतं तसं…”; सीमाप्रश्नावरून रोहित पवारांची मुख्यमंत्र्यांवर बोचरी टीका
- Sudhir Mungantivar | ‘शिंदे सरकार नामर्द आहे’ म्हणणाऱ्या संजय राऊतांना सुधीर मुनगंटीवार यांचं प्रत्युत्तर; म्हणाले,
- Chandrashekhar Bawankule | “षंढ, मर्दानगी, रेडे…राऊत जेलमधून ‘ही’ भाषा शिकून आले”; बावनकुळेंचा खोचक टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

