Share

Sanjay Raut Letter | “राऊतांचं भावनिक पत्र वाचून डोळ्यात पाणी आणणऱ्या लोकांनी एकदा हा व्हिडीओ बघाच”, मनसे नेत्या कडाडल्या

Published On: 

🕒 1 min read

मुबंई : पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या शिवसेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांची ईडी कोठडी संपली असून आता त्यांना न्यायालयीन कोठडीमध्ये ठेवण्यात आलं आहे. न्यायालयीन कोठडीत जाण्यापुर्वी संजय राऊतांनी त्यांच्या आईला पत्र लिहिलं होतं. संजय राऊत यांच्या भावनिक पत्राची जोरदार चर्चा रंगली असतानाच मनसे नेत्या स्नेहल सुधीर पारकर यांनी घंट्याचं भावनीक पत्र म्हणत टीका केली आहे.

स्नेहल सुधीर पारकर यांचा संजय राऊत यांच्यावर घणाघात –

स्नेहल सुधीर पारकर यांनी ट्वट करत एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये पत्राचाळ येथे राहणाऱ्या लोकांची मत ऐकून घेण्यात आली असून त्यांच्या घरांची अवस्था देखील दाखवण्यात आली आहे. घंट्याच भावनिक पत्र असं म्हणत जो मीडिया आज संजय राऊत यांच्या चार ओळींना भावनिक वैगरे बोलतोय, त्या मीडियाने एकदा पत्रा चाळ रहिवाश्यांची अवस्था पाहा, असं कॅप्शन पारकर यांनी दिलं आहे. तसेच राऊतांच्या अटकेनंतर सहकुटुंब त्यांच्या घरी भेट देणारे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पत्राचाळ रहिवाश्यांना भेटायला का नाही गेले ?, असा सवाल देखील पारकरांनी केला आहे.

पाहा ट्विट –

राऊतांचं आईला पत्र –

संजय राऊतांनी प्रिय आई, जय महाराष्ट्र म्हणत आपल्या पत्राची सुरुवात केली होती. तसेच यावेळी आताच माझी ईडी कोठडी संपली असून न्यायालयीन कोठडीत जाण्याआधी कोर्टाच्या बाहेरील बाकड्यावर बसून तुला हे पत्र लिहीत आहे, तुला पत्र लिहिण्याचा प्रसंग अनेक वर्षांनी आलाय, असं त्यांनी पत्रात सांगितलं आहे. पत्राच्या सुरुवाती पासूनच संजय राऊतांच्या पत्रात भावनिक शब्द वाचायला मिळाल्याने डोळ्यात पाणी आणण्यासारखं त्यांनी पत्र लिहिलं आहे.

खूप वर्ष पत्र लिहिण्याचा प्रसंग आला नाही. रोज ‘सामना’साठी अग्रलेख लिहीत होतो. स्तंभ लिहीत होतो, पण दौन्यावर नसेन तेव्हा तू आणि मी रोजव भेटत होतो. दौन्यावर असताना सकाळ संध्याकाळ फोनवर बोलत होतो. त्यामुळे तुला सविस्तर पत्र लिहायचे राहून गेले. आता हे पत्र लिहिण्याची संधी केंद्र सरकारने दिली, असं देखील राऊतांनी पत्रात म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!