Share

Andheri By Election | ठाकरे गटाचा प्लॅन बी! लटकें ऐवजी ‘या’ नेत्याला मिळेल उमेदवारी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : अंधेरी पोट निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठपल्या आहेत. एकनाथ शिंदे गट उद्धव ठाकरे गटाला अडचणीत आणत असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. तर मशाल चिन्हावर निवडणूक लढणार असणाऱ्या ऋतुजा लटके यांचा देखील राजीनामा अद्याप स्वीकारण्यात आलेला नाही. अशातच ठाकरे गटाने प्लॅन बी तयार ठेवला आहे. त्यानुसार लटकेंना राजीनामा न मिळाल्यास तीन नावांपैकी एकाला उमेदवारी मिळेल असं म्हटलं जातं आहे.

माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर, प्रमोद सावंत आणि कमलेश राय या तिघांपैकी एकाला अंधेरी पोट निवडणुकीसाठी उमेदवारी मिळू शकते. लटकेंचा राजीनाम्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मात्र, निर्णय जर ठाकरेंच्या विरोधात लागला तर या नावांपैकी एकाला उमेदवारी मिळेल.

प्रमोद सावंत हे अनिल परब आणि मातोश्रीच्या विश्वासातील असून त्यांनी शिवसेनेच्या अंधेरी पूर्व येथे संघटक म्हणून चोख पद्धतीने काम केलं आहे. विश्वनाथ महाडेश्वर यांना महापौर पदाचा चांगला अनुभव आहे. तर कमलेश राय हे उत्तर भारतीय असल्याने अंधेरी भागातील उत्तर भारतीय मतांचा ठाकरे गटाला फायदा होऊ शकतो.

मुंबई महापालिकेत ऋतुजा लटके कार्यरत आहेत. पोटनिवडणूक लढवण्यासाठी त्यांनी आपल्या शासकीय नोकरीचा राजीनामा दिला. मात्र अदयाप त्यांचा राजीनामा स्वीकार करण्यात आलेला नाही. त्यामुळे शिवसेनेतील नेत्यांची धावपळ सुरु होती. अशातच राजीनामा फेटाळल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट न्यायालयात धाव घेऊ शकतो.

निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena Uddhav Balasaheb Thackeray) गटाकडून ऋतुजा लटके तर भाजपकडून माजी नगरसेवक मुरजी पटेल यांच्यात मुख्य लढत होणार आहे. मात्र, मुरजी पटेल माघार घेणार असल्याचं म्हटलं जातं आहे. पोटनिवडणुकीवरून राजकीय रणनीती पाहायला मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!