Share

Andheri By-Elections । निकाल ऋतुजा लटकेंच्या विरोधात गेल्यास पर्यायी उमेदवार कोण?ठाकरे गटाचा प्लॅन B तयार

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : अंधेरी पोटनिवडणुकींच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. या निवडणुकीसाठी लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उद्धव ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर केली. मात्र त्या शासकीय कर्मचारी असल्याने महानगर पाकिकेने त्यांचा राजीनामा अर्ज फेटाळून लावला. आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजेच उद्धव ठाकरे गट न्यायालयात धाव घेण्याची शक्यता आहे. आमदार रमेश लटके (Ramesh Latke) यांच्या निधनामुळे अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागली आहे.

पोट निवडणुकीसाठी ठाकरे गटाचा प्लॅन B

पोट निवडणुकीसाठी ठाकरे गटाने प्लॅन B तयार केला आहे. मात्र, यासह आता ठाकरे गटाने नव्या प्लान नुसार घरातीलच व्यक्तीची निवड करण्याचा निर्णय घेतला आहे. निकाल ऋतुजा लटकेंच्या विरोधात गेल्यास रमेश लटके यांच्या आईला ठाकरे गट उमेदवारी देणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ठाकरे गटाकडून दिवंगत रमेश लटकेंच्या आईच्या नावाचा विचार आहे. तसेच ठाकरे गटाकडून विश्वनाथ म्हाडेश्वर, प्रमोद सावंत यांची नावे देखील उमेदवारीसाठी चर्चेत आहेत. प्लान बी नुसार या नावांचा विचार सुरु आहे.

ऋतुजा लटके यांचा राजीनामा महापालिकेने फेटाळला –

काही वेळापुर्वी महाविकास आघाडीला पाठिंबा देणाऱ्या ऋतुजा लटके शिवसेनेतील नेत्यांसोबत महापालिकेमध्ये गेल्या होत्या. यावेळी आजच आपला राजीनामा स्वीकारावा अशी विनंती लटकेंनी केली होती. मात्र, महापालिकेने ही विनंती फेटाळत राजीनामा देखील फेटाळला आहे. अंधेरी पोटनिवडणुकींच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्वाचा मानला जात आहे.

मुंबई महापालिकेत ऋतुजा लटके कार्यरत आहेत. पोटनिवडणूक लढवण्यासाठी त्यांनी आपल्या शासकीय नोकरीचा राजीनामा दिला. मात्र अदयाप त्यांचा राजीनामा स्वीकार करण्यात आलेला नाही. त्यामुळे शिवसेनेतील नेत्यांची धावपळ सुरु होती. अशातच राजीनामा फेटाळल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट न्यायालयात धाव घेऊ शकतो.

दरम्यान, निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena Uddhav Balasaheb Thackeray) गटाकडून ऋतुजा लटके तर भाजपकडून माजी नगरसेवक मुरजी पटेल यांच्यात मुख्य लढत होणार आहे. मात्र, मुरजी पटेल माघार घेणार असल्याचं म्हटलं जातं आहे. पोटनिवडणुकीवरून राजकीय रणनीती पाहायला मिळत आहे. ऋतुजा लटके यांना आपल्याकडे आणण्याचा बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच शिंदे गटाचा प्रयत्न असल्याची माहिती समोर येत आहे. बाळासाहेबांची शिवसेना पक्ष आणि भाजप युतीची उमेदवारी त्यांना द्यावी, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रयत्न करत आहेत.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!