Share

MNS | ऋतुजा लटके यांच्या विरोधात ‘या’ नेत्याने रचला डाव ; मनसे नेत्याचा गंभीर आरोप

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्यावरुन राजकर पेटताना दिसत आहे. लटकेंना राजीनामा न मिळाल्याने उद्धव ठाकरे गटाने सत्ताधारकांवर आरोप केले होते. त्यामुळे राजीनाम्यावरुन आरोप – प्रत्यारोप होताना दिसत आहेत. अशातच मनसे नेते मनोज चव्हाण यांनी उद्धव ठाकरे आणि अनिल परब यांच्यावर आरोप केले आहेत.

मनोज चव्हाण यांचा अनिल परब अन् उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप –

मनोज चव्हाण यांनी ट्विट करत अनिल परब आणि उद्धव ठाकरे राजीनामाचा कट रचत असल्याचा आरोप केला आहे. यावेळी मुळात लटकेताईंना राजीनाम्याच्या जंजाळात अडकऊन अंधेरी ची उमेदवारी विश्वनाथ महाडेश्वर यांना देण्याचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे अनिल परब यांचा डाव, लटके वहिनींनी ओळखावा इतकच, असं मनोज चव्हाण यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा प्लॅन बी –

ऋतुजा लटके यांचा राजीनामा अद्याप स्वीकारण्यात आलेला नाही. अशातच ठाकरे गटाने प्लॅन बी तयार ठेवला आहे. त्यानुसार लटकेंना राजीनामा न मिळाल्यास माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर, प्रमोद सावंत आणि कमलेश राय या तिघांपैकी एकाला अंधेरी पोट निवडणुकीसाठी उमेदवारी मिळू शकते. लटकेंचा राजीनाम्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

प्रमोद सावंत हे अनिल परब आणि मातोश्रीच्या विश्वासातील असून त्यांनी शिवसेनेच्या अंधेरी पूर्व येथे संघटक म्हणून चोख पद्धतीने काम केलं आहे. विश्वनाथ महाडेश्वर यांना महापौर पदाचा चांगला अनुभव आहे. तर कमलेश राय हे उत्तर भारतीय असल्याने अंधेरी भागातील उत्तर भारतीय मतांचा ठाकरे गटाला फायदा होऊ शकतो.

भाजपकडून माजी नगरसेवक मुरजी पटेल –

निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena Uddhav Balasaheb Thackeray) गटाकडून ऋतुजा लटके तर भाजपकडून माजी नगरसेवक मुरजी पटेल यांच्यात मुख्य लढत होणार आहे. मात्र, मुरजी पटेल माघार घेणार असल्याचं म्हटलं जातं आहे. पोटनिवडणुकीवरून राजकीय रणनीती पाहायला मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!