Share

Gulabrao Patil | संजय राऊतांनी आईला पत्र लिहिताच गुलाबराव पाटलांची देवाला प्रार्थना, म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या संजय राऊत यांची ईडी कोठडी संपली असून आता त्यांना न्यायालयीन कोठडीमध्ये ठेवण्यात येणार आहे. मात्र, न्यायालयीन कोठडीत जाण्यापुर्वी शिवसेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या आईला एक पत्र लिहिलं.त्यामध्ये त्यांनी मी झुकणार नसून सध्या सुरू असलेल्या अन्यायाला तोंड देणार आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. यावरून शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले गुलाबराव पाटील ?

संजय राऊत लवकरात लवकर बाहेर येवोत, अशी आपण प्रार्थना करुयात, असे गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. गुलाबराव पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

गुलाबराव पाटील म्हणाले की, मुलगा तुरुंगात असो, यात्रेत असो किंवा राजकारणात असो त्या मुलाने आपल्या आईला पत्र लिहिणे ही एक भावना आहे. यावर मी बोलणे बरोबर ठरणार नाही. पण आता त्यांच्यावर काही आरोप करण्यात आलेले आहेत. याच सकृतदर्शनी आरोपांमुळे ते तुरुंगात आहेत. देवाच्या कृपेने ते लवकरात लवकर बाहेर येवोत, अशी प्रार्थना करूयात.

तसचे, अंधेरी पोट निवडणूकसंदर्भातही त्यांनी भाष्य केलं आहे. राजीनामा मंजूर करण्याचे काही नियम असतात. नियमाप्रमाणे राजीनामा मंजूर होईल. काहीही झालं की सरकारकडे बोट दाखवलं जात आहे. आता एवढेच काम शिल्लक राहिलेले असल्याचं गुलाबराव पाटील यांनी याठिकाणी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!