Share

MNS on Governor| राज्यपालांनी वादग्रस्त विधान करून आपल्या बुध्दीमत्तेची कुवत सिद्ध केली – हेमंत संभूस

Published On: 

🕒 1 min read

पुणे : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या विधानांमुळे चर्चेत असतात. त्यांनी मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी माणूस निघून गेला तर मुंबई भारताची आर्थिक राजधानी राहणार नाही, असं विधान केल्यामुळे निर्माण झालेला वाद शांत होत नाही तोवरच त्यांनी पुन्हा एक अजब विधान केलं आहे. नागपुर विद्यापीठात बोलताना राज्यपाल म्हणाले कि, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे भारतीयांना परदेशात मान मिळत आहे, मोदी नसते तर देशाला जगभरात मान मिळालाच नसता. त्यांच्या याच विधानामुळे आता पुन्हा नवा वाद उफाळण्याची चिन्ह दिसत आहेत. तर याच विधानावरून मनसेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत संभूस यांनी राज्यपालांवर कडक शब्दात टीका केली आहे.

हेमंत संभूस म्हणाले कि, “राज्यपाल भगतसिंग कोश्यारी म्हणाले कि, परदेशात जे भारतीय उच्च पदं भूषवत आहेत त्यांना जो मान मिळत आहे, तो केवळ मोदीजींमुळे मिळत आहे. त्यांच्या या विधानामुळे त्यांनी पुन्हा एकदा भारतीयांचा अपमान केला आहे. आम्ही राज्यपालांना हे सांगू इच्छितो कि, आज परदेशात औदयोगिक क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात किंवा संस्थात्मक ठिकाणी जे भारतीय आपले स्थान भूषवत आहेत ते त्यांच्या गुणवत्तेमुळे भूषवत आहेत. ते कोणत्याही एका व्यक्तीमुळे भूषवत नाहीयेत. ते स्थान गेल्या ५० वर्षांपासून भूषवत आहेत. त्यामुळे राज्यपालांनी असं विधान करून मोदींचा उदो उदो करणं हे हास्यास्पद आणि निंदनीय आहे. हे विधान करून राज्यपालांनी पुन्हा एकदा आपल्या बुध्दी मत्तेची कुवत सिद्ध केली.”

अमोल मिटकरींचीही टीका
“मनमोहन सिंग, राजीव गांधी हे देखील पंतप्रधान झाले होते. इंदिरा गांधींनी तर स्वतःच बलिदान दिलं. काळी टोपी घातलेल्या तुमच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे किती लोक देशासाठी शाहिद झाले हे सांगा? गांधी घराण्याच्या लोकांनी देशासाठी आत्मबलिदान केलं आहे. पण तुम्ही ज्या प्रकारची विधानं करताय त्यावरून हे सिद्ध होत कि तुम्ही राज्यपाल नाहीये. भारतीय राज्यघटनेने सार्वभौम पद दिल आहे. पण तुम्ही नेहमीच अशी विधान करत आहेत त्यामुळे आमची हात जोडून विनंती आहे कि, तुम्ही राज्यपाल भवन खाली करा आणि तुमच्या उत्तराखंडला निघून जा. तुम्ही गेलात तर महाराष्ट्र कृतकृत्य होईल.”, अशा शब्दात राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज्यपाल कोश्यारी यांना खडे बोल सुनावले आहेत.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!