🕒 1 min read
मुंबई : परवा दिवशी महाराष्ट्राला हादरवून सोडणारी घटना समोर आली. विदर्भातील भंडारा जिल्ह्यात एका ३५ वर्षीय महिलेवर तिघांनी सामूहिक बलात्कार केला. इतकेच नाही तर या आरोपींनी सामूहिक बलात्कार केल्यावर या पीडितेला विवस्त्र अवस्थेत रस्त्यावर फेकून दिले आणि घटनास्थळावरुन पळ काढला. दरम्यान, अमानुष पद्धतीने झालेल्या अत्याचारामुळे पीडितेची प्रकृती बिकट असून नागपुरात तिच्यावर उपचार सुरू आहेत. याच घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य करत आरोपींना कडक शासन करण्याचे आदेश दिले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले कि, “भंडाऱ्यात घडलेली घटना ही अतिशय दुर्दैवी आणि निंदनीय आहे. मी स्वतः याबाबतीत डीजींशी (महासंचालक) बोललो आहे. तसंच रुग्णालयातील सिव्हील सर्जन यांच्याशीही बोललो आहे. पिडीतेच्या प्रकृतीविषयी काळजी घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. या प्रकरणातील गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली एसआयटी नेमण्यात आली आहे. त्याचबरोबर हि केस फास्ट टॅगमध्ये चालणार आहे जेणेकरून गुन्हेगारांवर तात्काळ आणि कठोर कारवाई होईल.”
काय आहे प्रकरण?
30 जुलै ते दोन ऑगस्ट दरम्यान 35 वर्षीय महिलेवर कनहाडमोह गावाजवळ वेगवेगळ्या आरोपींनी सामूहिक बलात्कार केले होते. त्यानंतर ती गावकऱ्यांना गंभीर अवस्थेत महामार्गाच्या शेजारी आढळली होती. सुरुवातीला तिला भंडाराच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तिची गंभीर अवस्था लक्षात घेत तिला नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिथेही तिची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.
या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तात्काळ तपासासाठी आपल्या टीम तयार केल्या आणि आरोपींचा शोध सुरू केला. सध्या या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. आणखी आरोपींचा शोध सुरू असून, गोंदिया पोलिसांनी शुक्रवारी दिवसभर भंडाऱ्यात तळ ठोकला होता.
महत्वाच्या बातम्या:
- Tiranga Campaign | दिल्लीतील महाराष्ट्र सदनात राज्यपालांच्या हस्ते हर घर तिरंगा मोहीमेचं उद्घाटन
- Shambhuraj Desai । मंत्री असताना महाराष्ट्रात किती फिरत होता?; शंभुराज देसाई यांचं आदित्य ठाकरेंना सवाल
- Amol Mitkari | राज्यपाल हे भाजपचे एजंट – अमोल मिटकरी
- Sandeep Deshpande | तुरुंगातून लेख लिहायला राऊत स्वातंत्र्य सैनिक आहेत काय?; संदीप देशापांडेंचा सवाल
- MNS। मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय लवकर घ्यावा, लोकांची सहनशक्ती संपत चाललीये; मनसेचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
