Share

Shambhuraj Desai । मंत्री असताना महाराष्ट्रात किती फिरत होता?; शंभुराज देसाई यांचं आदित्य ठाकरेंना सवाल

Published On: 

Shambhuraj Desai । मुंबई : राज्यातील राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड करून शिवसेनेला धक्का दिला, त्यांनतर सुरु झालेले आरोप प्रत्यारोपांचे सामने अजूनही थांबायचं नाव घेत नाहीत. कधी महाविकास आघाडी विरुद्ध शिंदे गट, भाजप आणि मनसे, तर कधी मूळ शिवसेना विरुद्ध शिंदे गट असे सामने रंगताना दिसून येत आहेत. त्यातच आदित्य ठाकरे यांचे महाराष्ट्र भर सध्या दौरे सुरु आहेत. यावरून आता शिंदे गटाचे बंडखोर आमदार आणि माजी मंत्री शंभूराजे देसाई यांनी जोरदार टीका केली आहे.

तसेच शंभुराज देसाई यांनीही उद्धव ठाकरे यांना हेच आवाहन केलं आहे. उद्धव ठाकरेंना सांगतो, आम्ही बाळासाहेब ठाकरे आणि वाजपेयी यांचे विचार घेऊन युतीचे सरकार चालवत आहोत. त्याला मैत्री दिनानिमित्त शुभेच्छा, आशीर्वाद देऊन सोबत पुढे यावे, असे आवहान शंभूराज देसाई यांनी उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. तसेच एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यावर टीका करणाऱ्या आदित्य ठाकरेंनी तुम्ही मंत्री असताना महाराष्ट्रात किती फिरत होता?, असा सवालच शंभुराजे देसाई यांनी केला आहे.

दरम्यान, याआधी मंत्रिमंडळ विस्तारावरून सध्या दोन लोकांचं जंबो मंत्रीमंडळ आहे. कोण मुख्यमंत्री, कोण उपमुख्यमंत्री हेच कळत नाही. कुणी कुणाला बोलू देत नाही. सध्या त्यांचं लक्ष घाणेरड्या राजकारणावर आहे. मी आजोबा आणि वडिलांसोबत लहानपणापासून फिरलो, पण इतकं घाणेरडं राजकारण पाहिलं नाही,” असं म्हणत आदित्य ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्ला चढवला.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!