🕒 1 min read
दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष असल्याच्या निमित्ताने ‘हर घर तिरंगा’ ही मोहीम सुरु केली आहे. ज्या अंतर्गत भारतीय नागरिकांनी या स्वातंत्र्यदिनाला आपापल्या घरांवर देशाचा राष्ट्रध्वज फडकवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे तिरंगा फडकवून ‘हर घर तिरंगा’ या मोहिमेचे उदघाटन केले. या वेळी त्यांच्यासह तेथील अधिकारी देखील उपस्थित होते.
यावेळी सर्वांनी तिरंगा हातात घेऊन ‘भारत माता कि जय’ आणि ‘हर घर तिरंगा’ अशा घोषणा देखील दिल्या. तर याच मोहिमेच्या पार्श्वभूमीवर सध्या सोशल मीडियावर देखील असाच प्रकारची मोहीम चालवली जात आहे. ज्यात अनके भारतीय नेटकऱ्यांनी आपल्या प्रोफाइल फोटोला आणि डिस्प्ले फोटोला तिरंग्याचे फोटो लावले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- Varsha Raut : वर्षा राऊत यांची 10 तास ईडी चौकशी; सर्व प्रश्नांची उत्तरे दिली
- Nilesh Rane । “केसरकर, नोकरी मागायची आहे तर नीट मागा, आमच्याकडे ड्रायव्हरची जागा रिकामी!”, निलेश राणेंचा पलटवार
- Ajit pawar | “…यांनाच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व्हायचंय”; अजित पवारांचे टीकास्त्र
- Ajit Pawar : 40 लोकांना मंत्रिपदाची गाजरं दाखवल्यावर अडचण होणारच; अजित पवारांनी पुन्हा डिवचलं
- Ajit pawar | “दिल्लीतून सिग्नल मिळत नाही तोपर्यंत…”; मंत्रिमंडळ विस्तारावरुन अजित पवारांचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
