अकोला : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या विधानांमुळे चर्चेत असतात. त्यांनी मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी माणूस निघून गेला तर मुंबई भारताची आर्थिक राजधानी राहणार नाही, असं विधान केल्यामुळे निर्माण झालेला वाद शांत होत नाही तोवरच त्यांनी पुन्हा एक अजब विधान केलं आहे. नागपुर विद्यापीठात बोलताना राज्यपाल म्हणाले कि, पंतप्रधान मोदींमुळे भारताला परदेशात मान मिळाला आहे, मोदी नसते तर देशाला जगभरात मान मिळालाच नसता. त्यांच्या याच विधानामुळे आता पुन्हा नवा वाद उफाळण्याची चिन्ह दिसत आहेत. तर याच विधानावरून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज्यपाल कोश्यारी यांना खडे बोल सुनावले आहेत.
“भाजपचे एजंट आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ कार्यकर्ते ज्यांनी काळी टोपी घालून 5 सप्टेंबर २०१९ ला राज्यपाल पदाचा पदभार स्वीकारला. त्यांना 2 वर्षे तीनशे तीन दिवस पूर्ण होत आहेत. पण या काळात त्यांनी पूर्णवेळ फक्त संघाचंच काम केलं. बहुजन समाजाच्या आराध्य दैवतांवर अश्लील टीका टिपण्ण्या करून प्रकाश झोतात राहण्याचं काम केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केली, महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल अपशब्द उच्चारले. गुजराती आणि राजस्थानी नसते तर मराठी माणसाला कुणी ओळखलं असत याप्रकारची विधानं करून स्वतःवर वाद ओढवून घेण्याचं काम त्यांनी केलं आहे. त्यांनतर त्यांनी माफीही मागितली. महाराष्ट्राच्या सूसंस्कृत इतिहासात राज्यपालांनी माफी मागण्याची हि पहिलीच वेळ असेल.”
राज्यपालांनी मोदींबद्दल केलेल्या विधानाचा समाचार घेत मिटकरी पुढे म्हणाले कि, “मनमोहन सिंग, राजीव गांधी हे देखील पंतप्रधान झाले होते. इंदिरा गांधींनी तर स्वतःच बलिदान दिलं. काळी टोपी घातलेल्या तुमच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे किती लोक देशासाठी शाहिद झाले हे सांगा? गांधी घराण्याच्या लोकांनी देशासाठी आत्मबलिदान केलं आहे. पण तुम्ही ज्या प्रकारची विधानं करताय त्यावरून हे सिद्ध होत कि तुम्ही राज्यपाल नाहीये. भारतीय राज्यघटनेने सार्वभौम पद दिल आहे. पण तुम्ही नेहमीच अशी विधान करत आहेत त्यामुळे आमची हात जोडून विनंती आहे कि, तुम्ही राज्यपाल भवन खाली करा आणि तुमच्या उत्तराखंडला निघून जा. तुम्ही गेलात तर महाराष्ट्र कृतकृत्य होईल.”, अश्या शब्दात त्यांनी राज्यपालांवर टीका केली आहे. तसेच त्यांनी माजी राज्यपालांच्या चांगल्या कामांचा उल्लेख देखील यावेळी केला.
महत्वाच्या बातम्या:
- Varsha Raut : वर्षा राऊत यांची 10 तास ईडी चौकशी; सर्व प्रश्नांची उत्तरे दिली
- Nilesh Rane । “केसरकर, नोकरी मागायची आहे तर नीट मागा, आमच्याकडे ड्रायव्हरची जागा रिकामी!”, निलेश राणेंचा पलटवार
- Ajit pawar | “…यांनाच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व्हायचंय”; अजित पवारांचे टीकास्त्र
- Ajit Pawar : 40 लोकांना मंत्रिपदाची गाजरं दाखवल्यावर अडचण होणारच; अजित पवारांनी पुन्हा डिवचलं
- Ajit pawar | “दिल्लीतून सिग्नल मिळत नाही तोपर्यंत…”; मंत्रिमंडळ विस्तारावरुन अजित पवारांचा इशारा


