पुणे : राज्यातील आमदारांसाठी मुंबईत ३०० घरे बांधण्याचा निर्णय राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आला. या घोषणेनंतर ठाकरे सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी या निर्णयासंदर्भात महत्वाचा खुलासा केला असून आमदारांना मोफत घरं मिळणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना अजित पवार म्हणाले की,‘मुख्यमंत्री म्हणाले की, आमदारांना घर देऊ, परंतु मीडियाने आमदारांना फुकट घरं देणार, असे म्हंटले. पण मी सांगतो कुणालाही घर मिळणार नाही. ज्यांना मुंबईत घर नाही अशांना घर मिळणार असे मुख्यमंत्री म्हणाले होते. मला आणि माझ्या बायकोला तर घर मिळूच शकत नाही’, असे पवार म्हणाले.
दरम्यान, या निर्णयासंदर्भात राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील स्पष्टीकरण दिले असून यासंदर्भात ट्विट करत ते म्हणाले की,‘आमदारांना देण्यात येणाऱ्या घरांवरून बराच गदारोळ होतोय. मी स्पष्ट करू इच्छितो की,सदर घरे मोफत देण्यात येणार नसून त्या जागेची किंमत+बांधकाम खर्च (अपेक्षित खर्च ७० लाख) याची किंमत संबंधित आमदारांकडून आकारण्यात येणार आहे.’
महत्त्वाच्या बातम्या –
- “जैसे ज्याचे कर्म, तैसे फळ देतो ईश्वर”, भातखळकरांचा मुख्यमंत्र्यांना जोरदार टोला
- “महाराष्ट्राच्या मंत्रालयात लता दीदींची गाणी कानावर पडली पाहिजे”, राज ठाकरेंची मागणी
- “…त्यामुळे पेट्रोल-डिझेलचे दर आणखी वाढणार”, अजित पवारांनी सांगितले कारण
- “…हे कोणत्या दंगलीत मुंबईकरांना वाचवत होते?”, केशव उपाध्येंचा मुख्यमंत्र्यांना सवाल
- दापोलीकडे निघण्यापूर्वी सोमय्यांनी दाखवला प्रतिकात्मक हातोडा; म्हणाले, “…यांना बाहेर घालवणार”


