मुंबई : राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (anil parab) यांच्या अनधिकृत रिसॉर्ट प्रकरणावरुन भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला असून परब यांचा हा रिसॉर्ट तोडण्यात यावा म्हणून सोमय्या आज (२६ मार्च) दापोलीकडे रवाना झाले आहेत. दरम्यान, दापोलीकडे निघण्यापूर्वी सोमय्यांनी प्रतिकात्मक हातोडा दाखवत ठाकरे सरकारला इशारा दिला आहे.
यावेळी बोलत असतांना सोमय्या म्हणाले की,‘हा हातोडा जनतेच्या भावनेचं प्रतिक असून जनता असाच हातोडा घेऊन यांना बाहेर घालवणार आहे. तसेच हा हातोडा साडेबारा कोटी जनतेचा आहे’, असे सोमय्या म्हणाले.
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,‘मुख्यमंत्री ठाकरे पोलिसांना नाचवतात, परंतु पोलीस जनतेचे आहेत.’ तसेच हा हातोडा ठाकरे सरकारमधील जे घोटाळेबाज, अनाधिकृत बांधकाम, वसुलीचा पैसा घेत आहेत त्या माफियांच्या विरोधात असल्याचेही सोमय्या यावेळी म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या –
- “दिल्लीच्या हातातील न्यायाचा तराजू हा खरा नसून…”, संजय राऊतांची टीका
- …यामुळे न्यायव्यवस्था आणि केंद्रीय तपास यंत्रणांवर विश्वास ठेवायचा तरी कसा?- संजय राऊत
- “…याबाबत सत्य सांगणारा ‘पेन ड्राईव्ह’ विरोधी पक्षाच्या घरात बाळंत का झाला नाही?”, राऊतांचा हल्लाबोल
- “…हे कोणत्या दंगलीत मुंबईकरांना वाचवत होते?”, केशव उपाध्येंचा मुख्यमंत्र्यांना सवाल
- “रावणाचा जीव बेंबीत होता, तसा काहींचा जीव मुंबईत”; उद्धव ठाकरेंचा टोला


