🕒 1 min read
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) सर्व प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडे देण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या या निर्णयाने विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, याच मुद्द्यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्या आजच्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून भाष्य केले आहे.
लेखात राऊत म्हणाले आहेत की,‘लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी न्यायालयांनाच पुढे यावे लागेल. पण आज हे सगळेच लोक बडे किंवा छोटे गुलाम बनून अंधभक्तीचा सूर आळवीत आहेत. परमबीर सिंह प्रकरणांचा तपास राज्याकडून सीबीआयकडे गेला हा ठाकरे सरकारला धक्का वगैरे असल्याचा ‘नाच’ विरोधक करीत आहेत. ते सर्वस्वी चूक आहे. यामुळे पुन्हा एकदा राज्य सरकारांच्या अधिकारांवरील आक्रमण समोर आले. दिल्लीच्या हातातील न्यायाचा तराजू हा खरा नसून चोर बाजारातला आहे हे उघड झाले.’
दरम्यान, पुढे ते म्हणाले की, ‘मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या सर्व गुन्ह्यांचा तपास सीबीआय करील, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. सत्य बाहेर येणे महत्त्वाचे आहे, असे सर्वोच्च न्यायालयाचे म्हणणे आहे. राज्याचे पोलीस परमबीरांच्या सर्व वीरकथांचा तपास करीत होते, त्यांनी फास आवळत आणलाच होता, पण सर्वोच्च न्यायालयाने तडकाफडकी परमबीरांची प्रकरणे सीबीआयकडे सोपवली. राज्याच्या पोलिसांवरचा अविश्वास धक्कादायक आहे. परमबीर सिंह यांच्यावर अँटिलिया स्फोटके प्रकरण, मनसुख हिरेन हत्या प्रकरण, अनेक खंडणी व धमक्यांची प्रकरणे दाखल आहेत. काही महिने ते फरार होते. परमबीरांच्या कागदी आरोपांमुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला. शंभर कोटी वसुलीच्या आरोपात ईडी, सीबीआय घुसले व देशमुखांना तुरुंगात जावे लागले, पण देशमुखांपेक्षा गंभीर आरोप परमबीर सिंह यांच्यावर आहेत, मात्र न्यायालयाने त्यांना अटकेपासून दिलासा दिला आहे. त्या दिलाशामुळे परमबीर बाहेर आहेत. मुंबई पोलिसांनी त्यांचा तपासही करायचा नाही व त्यांना हातही लावायचा नाही. आता तर सर्वच प्रकरणे केंद्रीय तपास यंत्रणांकडे सोपवून परमबीर सिंह यांना सर्वोच्च दिलासा देण्यात आला आहे.’
महत्त्वाच्या बातम्या –
- VIDEO : गजब बेज्जती है यार..! डेव्हिड वॉर्नरनं हसन अलीसमोर केलं ‘असं’ सेलिब्रेशन; तुम्हीही हसाल!
- शाहिद कपूरच्या पत्नीचं दुसरं लग्न? व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल
- “पेनड्राइव्ह आणण्यापेक्षा मला तुरुंगात टाका, मी…” – उद्धव ठाकरे संतापले
- PAK vs AUS : ऐतिहासिक मालिकाविजय..! तब्बल २४ वर्षानंतर ऑस्ट्रेलियानं रचला नवा इतिहास
- “रावणाचा जीव बेंबीत होता, तसा काहींचा जीव मुंबईत”; उद्धव ठाकरेंचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
