मुंबई : मागील काही दिवसांत राज्यात सुरू असलेल्या ईडी कारवाई विरोधात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काल (२५ मार्च) अर्थसंकल्पीय अधिवेशनात संताप व्यक्त केला. ठाकरे कुटुंबावर होत असलेल्या आरोपांवर सभागृहात त्यांनी सडेतोड उत्तर दिले. तसेच मला तुरुंगात टाका. पण कुटुंबीयांना त्रास देऊ नका. मी माझ्या शिवसैनिकांची जबाबदारी घेतो, अशी विनंती ठाकरे यांनी भाजपला केली आहे. दरम्यान, या मुद्द्यावरून आता भाजप नेते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी मुख्यमंत्री ठाकरेंवर टीका केली आहे.
यासंदर्भात केशव उपाध्ये यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले की,‘मुंबईतील दंग्यात वाचविणाऱ्या शिवसैनिकांना त्रास देऊ नका मला अटक करा असे छातीठोक सांगणाऱ्या मुख्यमंत्री ठाकरेंनी कृपया सांगा पाटणकर, यशंवत जाधव, प्रताप सरनाईक हे कोणत्या दंगलीत मुंबईकरांना वाचवत होते? मुळात बॅाम्बस्फोट करणाऱ्या दाऊदशी मालमत्ता घेणाऱ्या नवाब मलिक यांचे समर्थन आपण करत आहात’, असे उपाध्ये म्हणाले.
दरम्यान, ‘टाका मला तुरुंगात… कुटुंबाची बदनामी आम्ही कधीच केली नाही. तुमच्या सवडीनं आरोप गोळा करा. पेनड्राइव्ह आणण्यापेक्षा मला तुरुंगात टाका, मी तयार आहे. तुरुंग कोणता तर कृष्ण जन्मभूमीचा तुरुंग असेल त्यात टाका. मी कृष्ण नाही तसं तुम्ही कंस नाही, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काल विधानसभेत म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या –
- “दिल्लीच्या हातातील न्यायाचा तराजू हा खरा नसून…”, संजय राऊतांची टीका
- …यामुळे न्यायव्यवस्था आणि केंद्रीय तपास यंत्रणांवर विश्वास ठेवायचा तरी कसा?- संजय राऊत
- “…याबाबत सत्य सांगणारा ‘पेन ड्राईव्ह’ विरोधी पक्षाच्या घरात बाळंत का झाला नाही?”, राऊतांचा हल्लाबोल
- PAK vs AUS : ऐतिहासिक मालिकाविजय..! तब्बल २४ वर्षानंतर ऑस्ट्रेलियानं रचला नवा इतिहास
- “रावणाचा जीव बेंबीत होता, तसा काहींचा जीव मुंबईत”; उद्धव ठाकरेंचा टोला


