Share

“महाराष्ट्राच्या मंत्रालयात लता दीदींची गाणी कानावर पडली पाहिजे”, राज ठाकरेंची मागणी

Published On: 

मुंबई : महाराष्ट्राच्या मंत्रालयातील लिफ्टमध्ये दिवंगत लता दीदींची गाणी कानावर पडली पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राज्य सरकारकडे केली आहे. दरम्यान, पश्चिम बंगालचा संदर्भ देत राज ठाकरेंनी ही मागणी केली आहे.

यासंदर्भात एका पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत असतांना राज ठाकरे म्हणाले की,‘मी मध्यंतरी ममता बॅनर्जी यांना भेटायला पश्चिम बंगालच्या मंत्रालयात गेलो होतो. तेव्हा मंत्रालयामध्ये गेल्यावर लिफ्टचा दरवाजा उघडला आणि पश्चिम बंगालच्या मंत्रालयाच्या लिफ्टमध्ये किशोर कुमार यांची बंगालीतील गाणी लागली.’

दरम्यान, पुढे ते म्हणाले की,‘महाराष्ट्र राज्याने पंडित ह्रदयनाथ मंगेशकर यांच्यासारख्या लोकांना उचलून धरलं पाहिजे.’ तसेच पश्चिम बंगालने जो निर्णय घेतला तसाच निर्णय आपणही घ्यायला हवा. महाराष्ट्राच्या मंत्रालयात लिफ्टमध्ये लता दीदींची, आशा ताईंची, पंडितजींची गाणी लागायला पाहिजे. जो येईल त्याच्या कानावर ही गाणी पडली पाहिजे, असे राज ठाकरे म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!