🕒 1 min read
पुणे : घरगुती गॅस सिलेंडर महागला असून सर्वसामान्यांना महागाईचा चांगलाच फटका बसला आहे. फक्त इतकेच नाही तर पेट्रोल आणि डिझेलमध्येही ८० पैशांची वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, पेट्रोल-डिझेलचे दर आणखी वाढणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली आहे.
यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना अजित पवार म्हणाले की,‘रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक पातळीवर इंधनाच्या किमती वाढत आहेत. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर आणखी वाढणार आहेत.’ तसेच अर्थसंकल्प सादर करत असतांना सिलेंडर वापरणारा महिला वर्ग, सीएनजीवर चालणाऱ्या गाड्या या सगळ्यांचा एक हजार कोटी टॅक्स माफ करण्यात आला आहे, असेही पवार म्हणाले.
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,‘कोरोनानंतर आम्ही अर्थसंकल्पामध्ये एक रुपयाचीही वाढ केलेली नाही. तर त्यातून आम्ही फक्त मदत करण्याचा प्रयत्न केला आहे,’ असेही ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या –
- “जैसे ज्याचे कर्म, तैसे फळ देतो ईश्वर”, भातखळकरांचा मुख्यमंत्र्यांना जोरदार टोला
- “महाराष्ट्राच्या मंत्रालयात लता दीदींची गाणी कानावर पडली पाहिजे”, राज ठाकरेंची मागणी
- “खंडणी वसूली सोडून तुमचं सरकार…”, भातखळकरांचे टीकास्त्र
- “…हे कोणत्या दंगलीत मुंबईकरांना वाचवत होते?”, केशव उपाध्येंचा मुख्यमंत्र्यांना सवाल
- दापोलीकडे निघण्यापूर्वी सोमय्यांनी दाखवला प्रतिकात्मक हातोडा; म्हणाले, “…यांना बाहेर घालवणार”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
