मुंबई : मागील काही दिवसांत राज्यात सुरू असलेल्या ईडी कारवाई विरोधात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (२५ मार्च) अर्थसंकल्पीय अधिवेशनात संताप व्यक्त केला. ठाकरे कुटुंबावर होत असलेल्या आरोपांवर सभागृहात त्यांनी सडेतोड उत्तर दिले. तसेच मला तुरुंगात टाका. पण कुटुंबीयांना त्रास देऊ नका. मी माझ्या शिवसैनिकांची जबाबदारी घेतो, अशी विनंती ठाकरे यांनी भाजपला केली आहे. दरम्यान, या मुद्द्यावरून आता भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी मुख्यमंत्री ठाकरेंवर टीका केली आहे.
यासंदर्भात अतुल भातखळकर यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले की,‘मुख्यमंत्री ‘कुटुंबियांना त्रास नको’ असं म्हणत आहेत. समीर वानखेडे यांच्या कुटुंबियांना तुमचे प्रिय नवाब मलिक त्रास देत होते तेव्हा ‘good going’ म्हणून पाठ थोपटत होतात त्यांची.जैसे ज्याचे कर्म, तैसे फळ देतो ईश्वर…’, असे भातखळकर म्हणाले आहेत.
दरम्यान, ‘टाका मला तुरुंगात… कुटुंबाची बदनामी आम्ही कधीच केली नाही. तुमच्या सवडीनं आरोप गोळा करा. पेनड्राइव्ह आणण्यापेक्षा मला तुरुंगात टाका, मी तयार आहे. तुरुंग कोणता तर कृष्ण जन्मभूमीचा तुरुंग असेल त्यात टाका. मी कृष्ण नाही तसं तुम्ही कंस नाही, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काल विधानसभेत म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या –
- “दिल्लीच्या हातातील न्यायाचा तराजू हा खरा नसून…”, संजय राऊतांची टीका
- …यामुळे न्यायव्यवस्था आणि केंद्रीय तपास यंत्रणांवर विश्वास ठेवायचा तरी कसा?- संजय राऊत
- “…याबाबत सत्य सांगणारा ‘पेन ड्राईव्ह’ विरोधी पक्षाच्या घरात बाळंत का झाला नाही?”, राऊतांचा हल्लाबोल
- “…हे कोणत्या दंगलीत मुंबईकरांना वाचवत होते?”, केशव उपाध्येंचा मुख्यमंत्र्यांना सवाल
- दापोलीकडे निघण्यापूर्वी सोमय्यांनी दाखवला प्रतिकात्मक हातोडा; म्हणाले, “…यांना बाहेर घालवणार”


